Rain  Dainik Gomantak
महाराष्ट्र

'या’ तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

5 जून रोजी महाराष्ट्रात तळ कोकणात मान्सून दाखल होणार

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उन्हाच्या तडाख्याने नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. काही ठिकाणी प्रखर उन्हाचा तडाखा नसला तरी हवेतील उष्मा कमी होण्याचं नावं घेत न्हवता यामुळे दुपारच्या दरम्यान नागरिकांअभावी रस्ते ओस पडत होते. मात्र हवामान विभागानं दिलेल्या माहितीने नागरिकांची उन्हाच्या तडाख्यातून सुटका होणार आहे. कारण महाराष्ट्रात लवकरच मान्सून दाखल होणार आहे. (Monsoon will arrive in Maharashtra on this date )

नैऋत्य मोसमी पावसाचं अर्थात मान्सूनचं अंदमानमध्ये अर्थात बंगालच्या उपसागरात 16 मे रोजीच आगमन झालं आहे. याशिवाय केरळमध्ये येत्या 17 मे रोजीच पावसाचं झोकात आगमन होणार असल्याचं देखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यातील खरीप हंगामापूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.

संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेनं वाट पाहात आहे, त्या मान्सूनचं महाराष्ट्रात नेमकं कधी आगमन होणार आहे, या बैठकीमध्ये राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी यंदा संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामूळे बळीराजाच्या कामांना आता वेग येणार आहे. कारण खरीप शेतीची पावसाळ्यापूर्वी असणारी कामे वेगाने पुर्ण करता येणार आहेत.

होसाळीकर यांनी बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, येत्या 5 जून रोजी महाराष्ट्रात तळ कोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. अंदमानमध्ये16 मे रोजी दाखल झालेल्या मान्सूनचं केरळमध्ये 27 मे रोजी आगमन होण्याचा देखील अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच यंदा मराठवाड्यामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT