Monsoon Update: Heavy rains likely in the state, meteorological department alert Dainik Gomantak
महाराष्ट्र

Monsoon Update: राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट

गेल्या चार दिवसांपासून कोकणात संततधार सुरुच आहे. मात्र, काल उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पाऊस बरसत आहे .(Monsoon Update)

दैनिक गोमन्तक

अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात (Maharashtra) पुन्हा एकदा पावसाळा (Rain) सुरुवात झाली आहे.गेल्या चार दिवसांपासून कोकणात संततधार सुरुच आहे. मात्र, काल उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पाऊस (Heavy Rain) बरसत आहे . या पावसाचा जोरदार फटका शेतकऱ्यांना बसला आहे तर राज्याच्या अनेक जिल्ह्यात पुराने मोठे नुकसान झाले आहे. (Monsoon Update: Heavy rains likely in the state, meteorological department alert)

दरम्यान, हवामान विभागाने येत्या 24 तासांत राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे (Monsoon Update). कोकणातील पालघरमध्ये रेड अलर्ट तर ठाण्यासह उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

त्याचबरोबर आज मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात मुसळधार पावसाचाअंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातही पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. यामुळे खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झाले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र आता ॲक्टिव्ह झाले असून या क्षेत्रामुळे महाराष्ट्र राज्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबई, कोकणासह मराठवाड्यात देखील आज हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे . हा अंदाज व्यक्त करताना राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने मंगळवारी मराठवाड्यासह अहमदनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत हाहाकार उडवला. पुरात सात नागरिकांसह शेकडो जनावरे वाहून गेली. अतिवृष्टीमुळे शेतीचेही नुकसान झाले. अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कन्नड घाट आठ दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.चाळीसगावात तर पुपरिस्थिती भीषण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT