राज्यात अनेक भागांत सुरु असलेल्या पावसामध्ये पुढील दोन दिवसांत पुन्हा खंड पडणार असल्याचे दिसत आहे. Dainik Gomantak
महाराष्ट्र

Monsoon: राज्यात दोन दिवसानंतर पावसाला पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता

आज (बुधवार) सकाळपर्यंत विदर्भ (Vidarbha), मराठवाड्यात (Marathwada) मध्यम ते जोरदार पाऊस झाला. तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. यंदा उत्तर महाराष्ट्राला पावसाने ओढ दिली आहे

दैनिक गोमन्तक

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या (Marathwada, Vidarbha and Central Maharashtra) अनेक भागांत सुरु असलेल्या पावसामध्ये पुढील दोन दिवसांत पुन्हा ब्रेक लागणार असल्याचे दिसत आहे. तर कोकणात बहुतांश भागात ठिकाणी तर उत्तर महाराष्ट्र अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दक्षिण ओडिसा आणि उत्तर आंध्र प्रदेश लगतच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र विरुन गेले आहे. तर झारखंडच्या भागावर चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती झाली आहे. विदर्भापासून तामिळनाडूपर्यंत दक्षिण आणि उत्तरेकडे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. मॉन्सूनचे कमी दाबाचे क्षेत्र फिरोजपूरपासून बंगालच्या उपसागरात सक्रिय झाला आहे. उद्या नंदुरबार, पालघर, बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे.

आज ( बुधवार) सकाळपर्यंत विदर्भ, मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. यंदा उत्तर महाराष्ट्राला पावसाने ओढ दिली आहे. पण तेथेही आता चांगला पाऊस झाला. परंतु कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र पाऊस कमी झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT