Sanjay Raut Dainik Gomantak
महाराष्ट्र

Patra Chawl Land Case: संजय राऊतांना ईडीचे समन्स, उद्या पुन्हा होणार चौकशी

Sanjay Raut: सक्तवसुली संचालनालयाने (ED) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

दैनिक गोमन्तक

Patra Chawl Land Case: सक्तवसुली संचालनालयाने (ED) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. संजय राऊत यांना दुसऱ्यांदा सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंगच्या चौकशी संदर्भात समन्स बजावले आहे. पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांना उद्या सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यापूर्वीही संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावून त्यांचा जबाब नोंदवला होता.

दरम्यान, 1 जुलै रोजी त्यांची सुमारे 10 तास शेवटची चौकशी करण्यात आली होती. हे प्रकरण मुंबईतील पत्रा चाळ नावाच्या गृहसंकुलाच्या पुनर्विकासातील कथित घोटाळ्याशी संबंधित आहे. एप्रिलमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणासंदर्भात संजय राऊत यांच्या कौटुंबिक मालमत्ता जप्त केली होती.

हा कट आहे

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याला षडयंत्र म्हटले असले तरी तपासात सहकार्य करणार असल्याचे ठणकावून सांगितले. त्यांनी शेवटच्या चौकशीनंतर सांगितले होते की, "एजन्सीचे काम तपास करणे आहे. आमचे काम त्यांच्या तपासात सहकार्य करणे आहे. त्यांनी मला आज बोलावले म्हणून मी आलो. मी ईडीला सहकार्य करत राहीन."

संजय राऊत पुढे म्हणाले होते की, "ईडी (ED), सीबीआय (CBI) किंवा आयकर विभागाचे महत्त्व कमी होत चालले आहे. याआधी जेव्हा ही एजन्सी कोणतीही कारवाई करत असे तेव्हा असे वाटायचे की काहीतरी गंभीर घडत आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून असे दिसते आहे की, एजन्सीकडून कारवाई केली जाते. एक राजकीय पक्ष सूड उगवत आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा विधानसभा निवडणुकीची धग अन् आंदोलनांचा वणवा; सरकारसाठी धोक्याची घंटा? - संपादकीय

Goa Budget 2026-27: गोव्याचा अर्थसंकल्प राहणार 'पीपल सेंट्रिक', मुख्यमंत्र्यांनी साधला उद्योजकांशी संवाद; रोजगारावर देणार विशेष भर!

"बाबर तू T20 मधून निवृत्ती घे!" श्रीलंकेविरुद्धच्या 'करो या मरो' सामन्यापूर्वी माजी कर्णधाराची बोचरी टीका

Shirgao Lairai Jatra: लईराई देवीची जत्रा निर्विघ्न पार पडणार! सुरक्षेसाठी 'स्पेशल टास्क फोर्स'ची स्थापना; सरकारनं कसली कंबर

Goa Weather: राज्यात उन्हाचा तडाखा वाढला! पारा 35 अंशांच्या पार जाणार; वेधशाळेनं दिला 'हा' मोठा इशारा

SCROLL FOR NEXT