Mumbai Dainik Gomantak
महाराष्ट्र

साकीनाका बलात्कार-हत्या प्रकरण: मोहन चौहानला न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा

साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणी न्यायालयाने (Court) मोहन चौहानला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

दैनिक गोमन्तक

साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणी न्यायालयाने मोहन चौहानला फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने याला दुर्मिळ प्रकरण म्हटले आहे. अशा प्रकरणांमध्ये दोषींना कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपीला शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारने न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने राज्याची विनंती मान्य केली. न्यायालयाने सांगितले की, आरोपीने पीडितेचे आतडे खराब केले होते त्यामुळे तिची पचनसंस्था पूर्णपणे बिघडली होती.

हत्या करण्यात आली होती

अंधेरीच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेसोबत आरोपी मोहन चौहानने क्रौर्याची परिसीमा ओलांडली होती. त्याने आधी महिलेवर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली. आरोपी मोहन चौहान हा व्यवसायाने चालक होता. या प्रकरणाची न्यायालयात (Court) सुनावणी सुरु असताना तो पीडित पक्षाच्या वकिलांना शिवीगाळ करत असे. तेव्हा सरकारी वकिलांनी यात सुधारणा करण्यास वाव नसल्याचे सांगितले होते.

कोर्टात रडत होते आरोप करताना

सोमवारी न्यायालयाने मोहन चौहानला बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरवले होते. त्याला किती शिक्षा व्हावी, असा प्रश्न आरोपीला कोर्टात विचारण्यात आला, तेव्हा तो मोठ्याने रडू लागला आणि या प्रकरणात आपल्याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचा आरोप केला. दुसरीकडे, दोषीच्या वकिलांनी सांगितले की, ही दुर्मिळ घटना नाही कारण पीडित महिला (Women) या घटनेनंतरही जिवंत होती आणि तिला वाचवता आले असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Russian Woman Viral Video: 'पाणीपुरी नको!' म्हणत रशियन महिलेनं फिरवली पाठ; पण भेळपुरीची चव चाखताच म्हणाली, Wow.... पाहा व्हिडिओ

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT