mns chief raj thackeray warns people create choas at mns Aurangabad rally Dainik Gomantak
महाराष्ट्र

औरंगजेबाला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी कळाले; राज ठाकरे

राज ठाकरेंच्या भाषणावेळी लागली अजान, यांना नीट कळत नसेल तर एकदा होऊन जाऊदे-राज ठाकरे

दैनिक गोमन्तक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला सुरुवात झाली आहे. सभेच्या सुरुवातीलाच त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. दोनच सभा मी घेतल्या, पण या दोन सभांवरुन किती जण बोलतात. आजच्या सभेत सरकारची जी काही उरली सुरली राहिली आहे, ती काढण्यासाठी म्हणून आजची सभा घेतोय, असं राज ठाकरे म्हणाले. (raj thackeray warns people create choas at mns Aurangabad rally)

राज ठाकरे पुढे म्हणाले, ''छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने आपल्याला स्वराज्याचा अर्थ समजवला. स्वाभीमानानं कसं जगायचं हे देखील आपल्या महाराजांनी शिकवलं. औरंगजेबाला त्यावेळी खऱ्या अर्थाने कळालं होतं की, छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही तर विचार आहे. मात्र आज आपण या महापुरुषांच्या केवळ जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करतोय. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या समोर मांडला.''

लाऊडस्पीकरचा हा मुद्दा जुना आहे. माझ्याआधी अनेकांनी हा विषय मांडला आहे. मी मशिदीवरच्या भोंग्याला हनुमान चालीसाचा फक्त त्याला पर्याय दिला आहे. मला महाराष्ट्रात कुठेही दंगली घडवायच्या नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले. 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही. 4 मे नंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले आहे.

सरळ मार्गाने समजत नसेल तर मग महाराष्ट्राच्या मनगटातील ताकद दाखवण्याची वेळ आली आहे, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या भाषणावेळी अजान लागली, त्यावर बोलताना यांना नीट कळत नसेल तर एकदा होऊन जाऊदे. असा इशारा यावेळी त्यांनी दिला. पोलिसांना विनंती आहे हे वेळीच बंद करा, यांना समजत नसेल तर एकादा काय ते होऊन जाऊदे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Old Goa Accident: अपघातांची मालिका काही थांबेना, ओल्ड गोव्यात कार-दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Rama Kankonkar Assault: रामा काणकोणकर मारहाण प्रकरणी आंदोलक आक्रमक, अडवली दयानंद बांदोडकर रोडवरील वाहतूक; मांडवी पुलाजवळही वाहतूक ठप्प

CM प्रमोद सावंत यांच्या निवास्थानाबाहेर तगडा पोलिस बंदोबस्त; काणकोणकर मारहाण प्रकरण तापले, राजकीय नेते हजारो नागरिक रस्त्यावर

Rama Kankonkar Assault: रामा काणकोणकरांवरील हल्ल्याचा निषेध; विरोधकांचे सरकारविरोधी आंदोलन, सोमवारी 'गोवा बंद'चे काँग्रेसचे आवाहन

Lashkar-e-Taiba Video: कोसळलेल्या मशीदीचे तुकडे दाखवले, 'ऑपरेशन सिंदूर'च्या कारवाईचा पुरावा आता लष्कर-ए-तोयबाने दिला

SCROLL FOR NEXT