Raj Thackeray|CM Uddhav Thackeray  Danik Gomantak
महाराष्ट्र

राज ठाकरेंनी सीएम उद्धव यांना लिहीलं पत्र, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

'सत्ता येते आणि जाते. ताम्रपट कोणी आणला नाही... उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही.'

दैनिक गोमन्तक

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले पत्र लिहिले आहे. ज्यात राज ठाकरे म्हणाले आहेत की, मला राज्य सरकारला सांगायचे आहे की, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. (Raj Thackeray Letter to CM Uddhav)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की, 'सत्ता येते आणि जाते. ताम्रपट कोणी आणला नाही... उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही.' याशिवाय या ट्विटसोबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्रही पोस्ट केले आहे.

लाऊडस्पीकरवरून वाद

मशिदींमध्ये लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरवरून राज ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारमध्ये वाद सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. याप्रकरणी राज ठाकरेंसह त्यांच्या अनेक समर्थकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी औरंगाबादेत मोठी रॅली काढली होती, ज्यात हजारो समर्थकांनी हजेरी लावली होती. यानंतर पोलिसांनी रॅलीसंदर्भात गुन्हा दाखल केला. त्याच बरोबर राज ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारला लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटमही अनेकदा दिला आहे. राज ठाकरे हे सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व आणि विचारधारेबाबत प्रहार करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT