Amit Thackeray & Mithali Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

अँग्री यंगमॅन राजसाहेब झाले आजोबा; अमित-मिताली यांना पुत्ररत्न

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि सूनबाई मिताली ठाकरे (Mithali Thackeray) यांना पुत्रप्राप्ती झाली. ब्रीच कँन्डी रुग्णालयामध्ये (Breach Candy Hospital) यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. (Mithali Thackeray has given birth to a child)

दरम्यान, राज ठाकरे यांना आजोबा झाल्याची माहीती मिळताच ते स्वत: ब्रीच कँन्डी रुग्णालयात दाखल झाले. तसेच त्यांचे इतर ठाकरे कुटुंबीयही रुग्णालयात तात्काळ पोहोचले. नव्या पाहुण्याचे घरी आगमन झाल्याने ठाकरे कुटुंबामध्ये नव चैत्यनाचे वातावरण आहे.

कोण आहे मिताली ठाकरे?

27 जानेवारी 2019 रोजी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह झाला. लोअर पर सेंट रेजिस हॉटेलमध्ये त्यांचा विवाह संपन्न झाला होता. मिताली बोरुडे या फॅशन डिझायनर आहेत. विशेष म्हणजे मिताली यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केले. काही वर्षापूर्वी राज ठाकरे यांची कन्या उर्वशी आणि सून मिताली यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रॅंड लॉन्च केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

RCB Fans Lathi Charge Video: आरसीबीचा विजय फॅन्सच्या अंगाशी! हुल्लडबाजी नडली, पोलिसांनी काठीनं चोप चोप चोपलं; पाहा व्हिडिओ

Donald Trump: अमेरिकेत नवा वाद! जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन यांच्या पंक्तीत आता डोनाल्ड ट्रम्प; 'त्या' फोटोनं जगाला चक्रावलं

SCROLL FOR NEXT