MIT-ADT University  Dainik Gomantak
महाराष्ट्र

MIT-ADTU : कल्पक विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी यशाचा मार्ग

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासह विविध उपक्रमांच्या माध्यमातून भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम बनवले जाते.

दैनिक गोमन्तक

जगाची अर्थव्यवस्था सध्या नाविन्यपूर्ण उद्योजकतेवर चालते. भारतातील तरुणाई या नाविन्यपूर्ण कल्पनांचे आव्हान स्वीकारण्याची आणि देशाच्या जीडीपीला हातभार लावण्याची तयारी ठेवतात. अशा कल्पक विद्यार्थ्यांसाठी एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे हा एक चांगला पर्याय आहे. एमआयटी - एडीटी विद्यापीठात आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजीतील विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जात आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासह विविध उपक्रमांच्या माध्यमातून भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम बनवले जाते. यातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास करण्याचा विद्यापीठाचा हेतू आहे. (MIT ADTU The path to success for creative student careers)

दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व आणि प्रेरणास्त्रोत एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ. दा. कराड आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयटी एडीटी विद्यापीठ अल्पावधीतच एक उत्कृष्ट असे शैक्षणिक विद्यापीठ म्हणून नावारुपाला आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ. मंगेश कराड यांचा असलेला मोठा जनसंपर्क, संशोधनवृत्ती आणि चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची पद्धत विद्यापीठाच्या एकूण कामकाजात प्रभावी ठरत आहे. पदवीचे अभ्यासक्रम, सुपर स्पेशल प्रोग्रॅम, रोजगाराभिमुख आणि इंडस्ट्रीची मागणी यानुसार विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी तयार व्हावा यासाठी पुढाकार घेत ते मोलाची भूमिका बजावत आहेत.

एमआयटी एडीटी विद्यापीठात इंजिनिअरिंगच्या शाखेत अर्टिफिशयल इंटेलिजन्स (एआय), ब्लॉकचेन, सायबर सेक्युरिटी अँड फॉरेन्सिक्स, क्लाऊड कॉम्प्यूटिंग, एरोस्पेस, रोबोटिक्स, बायोइंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, मरीन इंजिनिअरिंग आणि नॉटिकल सायन्स हे अभ्यासक्रम शिकवले जातात. भारतातील सर्वोत्कृष्ट डिझाईन संस्थांपैकी एक म्हणून स्कूल ऑफ डिझाइनची ओळख आहे. देशाच्या उभारणीत योगदान देण्यासाठी एमआयटी-एटीडी विद्यापीठाने स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसच्या पदवीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. यातून ज्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जायचे आहे त्यांना तयारीसाठी मार्गदर्शन मिळेल. याशिवाय ई-लर्निंग, आर्ट थेरपी यामध्ये एम. ए तर अप्लायड सायन्समध्ये बीएसस्सी (ऑनर्स) आणि इतर बरेच अभ्यासक्रम शिकवले जात आहेत.

एमआयटी स्कूल ऑफ व्हालिस्टिक डेव्हल्पमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जिंकण्याची वृत्ती आणि आत्मविश्वास निर्माण केला जातो. जागतिकीकरणात जगासमोर असलेल्या आव्हानांचा सामना करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण केली जाते. सादरीकरण आणि क्रिएटिव्ह आर्ट, संवाद कौशल्ये, भाषा कौशल्य, फिटनेस, परदेशी भाषा, साहित्य, आंतरसंस्कृतीचा अभ्यास, सेवा, अध्यात्मिक आणि मूल्य शिक्षण हे विद्यापीठातील अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला या गोष्टी शिकाव्याच लागतात आणि त्याचे योग्य असे मार्गदर्शन विद्यापीठात दिले जाते. एमआयटी स्कूल ऑफ कॉर्पोरेट इनोव्हेशन अँड लीडरशिप (एमआयटी-एससीआयएल) यामध्ये व्यावसायिक गरजांवर आधारीत सॉफ्ट स्किल्स, रोजगार वाढवण्यासाठी आवश्यक कौशल्ये, लॉजिकल रिझनिंग यासह विविध कोर्स उपलब्ध करून दिले जातात.

यंग अॅस्पिरन्ट्सचे रिसर्च अँड इनोव्हेशन सेंटर (CRIYA) या अंतर्गत विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कला आणि डिझाइनमध्ये नवनिर्मितीसाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक मनोवृत्ती विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. याचा अभ्यासक्रम हा डिझाइनशी संबंधित असा असून ठराविक चौकटीच्या बाहेर पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना नियमित कार्यशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाते.

अटल इन्क्युबेशन सेंटर

उद्योजकतेत भारताचं स्थान निर्माण व्हावं यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाने अटल इन्क्युबेशन सेंटर (Atal Incubation Centre) सुरु केले. निती आयोगाने मान्यता दिलेले हे सेंटर महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठातील पहिले सेंटर आहे. अटल इन्क्युबेशन सेंटरने आजपर्यंत 27 स्टार्टअपने सुरू केले आहे. तसेच MIT Centre for Future Skills Excellence (MIT-FuSE)ची स्थापना भारतातील व्यावसायिकांना आणि पदवीधारकांना भविष्यात संधी देण्यासाठी ऑनलाइन प्रोग्रामच्या माध्यमातून मदत करणे हा आहे.

विद्यापीठात फक्त अर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) किंवा रोबोटिक्स यांसारखे उद्योग चालवणाऱ्या तंत्रज्ञानासोबतच प्रवेश प्रक्रियेपासून विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्या हिताच्यादृष्टीने शिक्षणाच्या व्यवस्थेत काही नवे बदल केले. सध्या विद्यापीठात ईआरपी सिस्टिमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासोबतच प्रोक्टर्ड परीक्षा घेतल्या जात आहेत. आहे. काळानुसार फक्त डिजिटलकडे वळून विद्यापीठ थांबलेले नाही तर मूल्यांकन आणि मूल्यमापनातसुद्धा नवे बदल केले आहे. प्रोक्टर्ड परीक्षा पद्धतीद्वारे परीक्षा घेऊन वेळेवर निकाल जाहीर करणारे हे पहिले विद्यापीठ म्हणून नावारुपाला आले आहे. एमआयटी-एडीटी विद्यापीठ आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाइन शैक्षणिक मार्गदर्शन मेळाव्याचे 10 ते 12 ऑगस्ट या कालावधीत आयोजन केले आहे. यामध्ये MIT ADTU सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन करणार आहे. सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 मध्ये मोफत नोंदणीसाठी www.sakalexpo.com या संकेतस्थळाला भेट द्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT