Crime News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Pandharpur: प्रेमविवाहाला नकार दिल्याने वडिलांची दगडाने ठेचून हत्या, पंढपूरमधील घटना

आरोपी अल्पवयीन मुलीचे मयताच्या मुलाशी प्रेमप्रकरण होते. हे दोघेही लग्न करणार होते.

गोमन्तक डिजिटल टीम

देवाच्या पंढपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहाला नकार दिल्याने मुलानेच वडिलांची हत्या केली आहे. याप्रकरणी पंढरपूर पोलिसांनी अल्पवयीन प्रेयसी आण तिच्या भावाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी लातूर येथील असलेल्या दोन अल्पवयीन बहिण-भाऊ आणि मृताच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कासेगाव येथील खडी क्रशरजवळ एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच, मृतदेह अर्धवट जाळण्यात आला होता. दरम्यान, यावेळी ग्रामस्थांनी दोन अल्पवयीन भावंडांना तेथेच थांबवून ठेवलं होतं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन भावंडांची चौकशी केली. चौकशीअंती त्यांनी हत्येची कबुली दिली.

अत्यंत क्रूरपणे केली हत्या

मयत इसमाला अल्पवयीन आरोपी रिक्षातून घटनास्थळी घेऊन आले. त्याच्या डोळ्यात चटणीची पूड टाकून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. व्यक्ती पळून जाऊ लागताच पायाला दोरी बांधून, डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. आरोपी अल्पवयीन मुलीचे मयताच्या मुलाशी प्रेमप्रकरण होते. हे दोघेही लग्न करणार होते. अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT