Police Bharti Dainik Gomantak
महाराष्ट्र

Police Bharti: महाराष्ट्रात पोलीस 'महा'भरती ! 14,956 पदांसाठी एक नोव्हेंबरपासून भरती प्रक्रिया

एक नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्रात मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात 14 हजार 956 पोलीस शिपाई रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी राज्य पोलीस मुख्यालयाने 2021 मध्येच रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे. एक नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. एक नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या बैठकीनंतर राज्यात वीस हजार पोलिसांची पदे भरण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता पोलीस भरतीची माहिती समोर आली आहे. भरती प्रक्रियेअंतर्गत मुंबई पोलीस दलात सहा हजार 740 रिक्त पदे भरली जाणार आहेत. तीन नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर यादरम्यान पोलीस भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

पोलीस भरतीची माहिती

पोलीस भरतीबाबतची माहिती policerecruitment2022.mahait.org आणि WWW.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT