Mumbai Airport Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबई विमानतळावर 60 कोटींचे अमली पदार्थ जप्त

मुंबई विमानतळावरुन 60 कोटींचे अंमली पदार्थांची जप्त करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई विमानतळावरुन 60 कोटींचे अंमली पदार्थांची जप्त करण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई कस्टम विभागाने झिम्बाब्वे येथे राहणाऱ्या एका महिलेला मुंबई विमानतळावरून (Mumbai Airport) अटक केली आहे. 12 फेब्रुवारीला झिम्बाब्वेहून (Zimbabwe) मुंबई विमानतळावर आलेल्या महिलेच्या झडतीत 6 किलो अंमली पदार्थ आणि 1480 ग्रॅम मेडीसीन जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 60 कोटी एवढी आहे. अटकेत असलेली महिला अमली पदार्थ तिच्या ट्रॉली बॅग आणि फाईल फोल्डरमध्ये लपवून ठेवले होते. AIR इंटेलिजन्स युनिट (AIU) ने ड्रग्ज जप्त करण्याची देखील कारवाई केली आहे. याप्रकरणी पुढील सर्व कारवाई करण्यात येत आहे.

जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 60 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याआधी शनिवारी भारतीय नौदल (Indian Navy) आणि एनसीबीच्या (NCB) संयुक्त कारवाईत पाकिस्तानमधून (Pakistan) येणारे 763 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त केलेल्या औषधांच्या या मोठ्या खेपाची किंमत अंदाजे 2000 कोटी रुपये एवढी आहे. ही अंमली पदार्थांची खेप खोल समुद्रात पकडण्याची कारवाई करण्यात आली.

या मध्ये चरस, हेरॉइन आणि मेथॅम्फेटामाइनचा अंमली पदार्थांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थाची ही खेप पाकिस्तानमार्गे येत होती. याबाबत बोलताना एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे, ज्यामध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीची माहिती समोर आला आहे.

इनपुट मिळाल्यानंतर, एनसीबीने भारतीय नौदलाच्या सहकार्याने उपमहासंचालक संजय कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. अरबी समुद्रातून गुजरात किंवा मुंबईच्या दिशेने दोन मोठ्या बोटी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ घेऊन येत असल्याची गुप्त माहिती एजन्सीला मिळाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव, अधिकार्‍यांनी NCB आणि नौदलाच्या दिग्गजांनी अमली पदार्थांची खेप घेऊन जाणारी जहाजे कोठून थांबवली होती ते नेमके ठिकाण सांगितले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Century: अभिषेक शर्माचा रौद्रावतार! 10 षटकार अन् 8 चौकारांसह ठोकलं शानदार शतक; न्यूझीलंडच्या गोलंदाजांची उडाली दाणादाण

1 November Rules Change: गॅस सिलिंडरपासून पेन्शनपर्यंत! 1 नोव्हेंबरपासून बदलणार 6 महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

Ranji Trophy: 6 बाद 84 वरुन गोव्याचे शानदार कमबॅक! दर्शन-यशची शतकी भागीदारी; पहिल्या दिवसाअखेर संघाने ओलांडला द्विशतकाचा टप्पा

Viral Video: चहा विकून महिन्याला 9 लाखांची बक्कळ कमाई! चहावाल्यानं सांगितलं यशाचं गमक; म्हणाला, 'PM मोदींच्या संघर्षातून घेतली प्रेरणा...'

Asgaon Water Crisis: आसगाव ग्रामसभेत पाणीटंचाईचा मुद्दा गाजला; बहुमजली प्रकल्पांना विरोध करत ग्रामस्थांचा एल्गार, अपुऱ्या पावसामुळे पाण्याचे दुर्भीक्ष

SCROLL FOR NEXT