Jaykumar Gore Dainik Gomantak
महाराष्ट्र

Satara Video: साताऱ्यातील भाजप आमदाराच्या गाडीला भीषण अपघात, गाडी 50 फूट खोल दरीत कोसळली

नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी दरीत कोसळली.

Pramod Yadav

सातारा जिल्ह्यातील मान खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आमदार गोरे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. फलटण येथील बानगंगा नदीच्या पुलावरुन गोरे यांची गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली. नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी दरीत कोसळली.

(Man-Khatav, Satara BJP MLA Jaykumar Gore Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार जयकुमार गोरे मुंबईहून आपल्या घरी जात असताना बानगंगा नदीवर त्यांचा अपघात झाला. गोरे यांची गाडी 50 फूट दरीत कोसळली. नदीच्या पुलाचा कठडा तोडून गाडी खाली कोसळली. जयकुमार गोरे यांच्यासोबत गाडीत त्यांचे कॉन्सटेबल, पीए आणि काही कार्यकर्ते गाडीत होते. या तिघांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटण येथे अपघात झाला असून ते सुखरूप बचावले आहेत. त्यांची प्रकृती एकदम चांगली आहे. गाडीतील इतर लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्वांची प्रकृती बरी आहे. सध्या पुण्यातील रूबी हॉल येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व कुटुंबीय त्यांच्यासोबत आहेत. असे निवेदन आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्यालयाच्या वतीने जारी करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT