Ajit Pawar Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील जनतेला पेट्रोल-डिझेल दरवाढीला तूर्तास दिलासा नाही; अजित पवार

जगासह, देशातून, महाराष्ट्रातून कोरोना पूर्णपणे नाहीसा कर, असे साकडं अजित पवार (Ajit Pawar) यांनी विठूरायाला (Vitthal) घातले.

दैनिक गोमन्तक

पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel) दरात कपात होणार अशी आशा असलेल्या राज्यामध्ये लोकांना नाराज करण्यात आले आहे. कर कपातीचा कोणताच विचार केला जात नाही. येणाऱ्या अधिवेशनापूर्वी कर कमी करायचे असल्यास, याचे किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल हे पाहणे गरजेचे आहे आणि यावरून निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पंढरपूर येथील आज कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजेच्या वेळी बोलत होते.

केंद्र सरकारने (Central Government) उत्पादन शुल्क कपात करत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या. तसेच केंद्राने राज्यांनाही कर कमी करा अशी विनंती केली होती. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रीया दिली.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्‍मिणीची (Vitthal-Rukmini) कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. महापूजा झालेनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार याचना याबाबत माहिती दिली. तसेच आजच्या ‘कार्तिकी एकादशी’ निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने विठूरायाच्या चरणी मस्तक ठेऊन येणाऱ्या पुढील काळात जगासह, देशातून, महाराष्ट्रातून कोरोना (covid 19 )पूर्णपणे नाहीसा कर, असे साकडं अजित पवार यांनी विठूरायाला घातले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT