महाराष्ट्र: गेल्या 9 वर्षांत पुणे(Pune),नाशिक(Nashik),सातारा,(Satara)व अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील 3500 हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी होत आहेत. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईल वर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटनां घडत असतांनाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.
ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट: (Village security system)
घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.
गावातील कार्यक्रम / घटना विना विलंब नागरी स्थांना एकाच वेळी कळणे.
अफवांना आळा घालणे.
प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.
पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.
ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये
संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा
गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत
संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 1800 270 3600
यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात (Disaster period)संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.
दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता , ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते. नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात नियमाबाह्य दिलेले संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत. एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य. वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या 10 किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो. घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही तोपर्यंत रिंग वाजते. संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.
चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप Black List होतात.गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.सरकारी कार्यालये, पोलीस स्टेशन (Police station)आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना आदेश देता येणे शक्य आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.