khelo india games 2022 Dainik Gomantak
महाराष्ट्र

खेलो इंडिया गेम्स 2022 मध्ये महाराष्ट्र अव्वल

महाराष्ट्राने 24 सुवर्ण पदकांसह एकूण 67 पदकांची केली कमाई

दैनिक गोमन्तक

हरियाणातील पंचकुला येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. कारण खेलो इंडिया यूथ गेम्स 2022 या स्पर्धेची गुणतालीका पाहीली तर महाराष्ट्राने या स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी केली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राने 24 सुवर्ण पदकांसह एकूण 67 पदकांची कमाई केली आहे. गुणतालीकेत महाराष्ट्र अव्वल आहे. ( maharashtra top one in khelo india games 2022 )

पंचकुला येथील सुरु असलेल्या स्पर्धेत 24 सुवर्ण पदकांसह एकूण 67 पदकांची कमाई करत महाराष्ट्राने अव्वलस्थान पटकावले आहे. त्या पाठोपाठ अनुक्रमे हरियाणा, मणिपूर, तामिळनाडू,पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, चंदीगड या राज्यांनी क्रमांक लावले आहेत.

महाराष्ट्रातील खेळाडूंची कबड्डीत ही दमदार कामगिरी

हरियाणातील पंचकुला येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. कबड्डीत महाराष्ट्राच्या मुलींनी रौप्य तर मुलांनी केली कास्य पदकाची कमाई केली. तसेच मुलांच्या कबड्डी संघानेही कास्य पदकाची कमाई केली आहे.

सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये आज कबड्डीच्या मैदानावर महाराष्ट्राच्या मुलींनी रौप्य पदकाची कमाई केली. सुवर्णपदकासाठी हरियाणाशी झालेली लढत त्यांना जिंकता नाही. महाराष्ट्राच्या संघाचा हरियाणाकडून 19 गुणांनी पराभव झाला. याशिवाय, मुलांच्या कबड्डी संघानेही कास्य पदकाची कमाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT