Maharashtra CM Eknath Shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: शिंदे सरकारची कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवानिमित्त मोठी भेट!

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवानिमित्त एक मोठी भेट राज्य शासनाकडून देण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासनातील (State Government) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employees) एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवानिमित्त एक मोठी भेट राज्य शासनाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे म्हणजेच सप्टेंबर महिन्यात मिळणारे वेतन हे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाच्या अगोदर देण्यात यावे या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय (Government Resolution) आज जारी करण्यात आला आहे.

आज 24 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यातील वेतन/निवृत्तीवेतन कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाच्या पूर्वी देण्यात यावे यासाठी शासाने GR काढला आहे.

निश्चितच पगाराबाबत (Payment) राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय शासनाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा आहे. राज्य वित्त विभागाकडून 24 ऑगस्ट 2022 रोजी पगाराबाबत जारी करण्यात आलेला महत्त्वाचे शासन निर्णय घेण्यात आले आहे. ज्याचा लाभ राज्यातील सर्वसामान्य जनतेला होणार आहे.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्यात येत आहे. छत्तीसगड सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. महागाई भत्त्यात केलेले बदल ऑगस्टपासून लागू होतील. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या वाढीनंतर महागाई भत्ता (DA Hike) आता मूळ वेतनाच्या 34 टक्के करण्यात आला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा 17 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT