Maharashtra Sadan on fire in Delhi Dainik Gomantak
महाराष्ट्र

दिल्लीत महाराष्ट्र सदनाला आग

आरक्षितअसलेल्या राज्यपाल कक्षाला आग लागल्याची घटना घडली आहे

Abhijeet Pote

दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात आरक्षितअसलेल्या राज्यपाल कक्षाला आग लागल्याची घटना घडली आहे, दरम्यान या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक माहिती मिळत असली तरी आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.आगीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि जवानदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे.

आज सकाळी अचानक लागलेल्या या आगीने सर्वांचाच गोंधळ उडाला होता मात्र आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांच्या मदतीने ही आग आता आटोक्यात आणण्यात यश आलं . या आगीमुळे राज्यपाल कक्षातल्या मालमत्तेचं काही प्रमाणात नुकसान झालं असल्याचे समोर येत आहे. मात्र, आता ही आग विझवण्यात आली आहे. सदनातल्या इतर कोणत्याही भागाला या आगीचा फटका बसला नसल्याची माहिती सदनाचं व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lepidagathis Clavata: म्हादई खोऱ्यातल्या चोर्ला घाटानंतर 166 वर्षांनी फुललेली वनस्पती, 2024 मध्ये आढळली आंबोली परिसरात

Taleigao: वांगी, आंबा, तांदूळ, काजू बोंडेसाठी GI दर्जा मिळालेले; विशिष्ट मातीच्या गुणधर्माचे 'ताळगाव'

Goa Budget: विकासकामांचा धडाका, आश्वासनांची 99% अंमलबजावणी सुरू; फेब्रुवारीत गोव्याचा अर्थसंकल्प येणार?

Goa Third District: तिसरा जिल्हा झाला; पण 'रविं'चे स्वप्न पूर्ण झाले?

Kushavati District Goa: तिसऱ्या जिल्ह्यावरून वाद थांबेना! ‘कुशावती’चे मुख्यालय केपे नको; काणकोणवासीयांचे मत

SCROLL FOR NEXT