मनसे पक्ष  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: मनसेच्या नावाने खंडणी..

हा गुन्हा राजकिय (Political) सूड बुद्धीतून करण्यात आला असून या विरोधात मनसेकडून अतिरिक्त सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या (Commissioner of Police) कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नावाने खंडणी मागितल्या प्रकरणी मालाडच्या मालवणी पोलिस ठाण्यात (Police Station) मनसेच्या पदाधिकार्यांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर अटकेची कारवाई मालवणी पोलिसांनी केली आहे.

दिग्दर्शक (Director) मिलन वर्मा, निर्माते युवराज बोऱ्हाडे आणि चालक सागर सोलनकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी मड परिसरातल्या एका बंगल्याच्या सुरक्षारक्षकाला (security guard) मारहाण केली होती आणि या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल सध्या सोशल मिडियावर वायरल होत आहे.

या प्रकरणात पोलिसांनी एका मराठी अभिनेत्रीलाही (Actress) नोटीस बजावल्याचं सांगितलं जात आहे. सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तिघांना अटक केली.

मात्र वारंवार मनसे पदाधिकार्यावर झोन 11 मध्ये चुकीच्या पद्धतीने गुन्हे नोंदवून बदनाम केलं जात आहे. मालवणी येथील भाटीया स्टुडीओत एका मराठी चित्रपटासाठी जागा पाहण्यासाठी गेले असताना.

सुरक्षा रक्षकाने हे चुकीचे आरोप केल्याचे मत मनसे पदाधिकार्यांनी केले आहेत. हा गुन्हा (Crime) राजकिय सूड बुद्धीतून करण्यात आला असून या विरोधात मनसेकडून अतिरिक्त सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

SCROLL FOR NEXT