Maharashtra family suicide due to financial crisis Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Crime News: 'आमच्या मृत्यूला कोणालाही दोषी धरु नका'! आर्थिक विवंचनेतून पती, पत्नी आणि 19 वर्षांच्या मुलीनं संपवलं जीवन; महाराष्ट्र हादरला

Maharashtra Family Suicide Case: पिंपरी-चिंचवड परिसरातील मोरवाडी येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांच्या 19 वर्षांच्या मुलीने सामूहिक आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.

Manish Jadhav

Maharashtra Family Suicide Case: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. पिंपरी-चिंचवड परिसरातील मोरवाडी येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांच्या 19 वर्षांच्या मुलीने सामूहिक आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. गंभीर आर्थिक अडचणींना कंटाळून या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

हे कुटुंब मूळचे केरळ येथील रहिवासी असून गेल्या तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी भागात भाड्याने राहत होते. मृत व्यक्तींमध्ये विनोद पिल्लई (वय 50), त्यांची पत्नी श्रीजा पिल्लई (वय 45) आणि त्यांची 19 वर्षांची मुलगी पूर्णिमा पिल्लई यांचा समावेश आहे. शनिवारी विनोद पिल्लई यांची रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली, तर त्यांची पत्नी श्रीजा आणि मुलगी पूर्णिमा या दोघींना रविवारी डॉक्टरांनी मृत घोषित केले.

ही धक्कादायक घटना घडल्याचे तेव्हा समोर आले, जेव्हा श्रीजा पिल्लई ज्या मोरवाडीतील शाळेत कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होत्या, तेथील सहकाऱ्यांनी त्या कामावर न आल्याने त्यांना फोन केला. सतत फोन करुनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. यामुळे काळजी वाटल्याने सहकाऱ्यांनी जवळच राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधला. नातेवाईकांनी तातडीने पिल्लई यांच्या घरी जाऊन पाहिले असता, घराचा दरवाजा उघडाच होता आणि आत तिघेही गंभीर व बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. त्यांनी तात्काळ पोलिसांना खबर देऊन तिघांनाही रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिघांचीही जीवनज्योत मालवली.

घटनास्थळी पोलिसांना (Police) एक सुसाइड नोट सापडली, ज्यामध्ये त्यांनी आपल्यावर असलेल्या भीषण आर्थिक संकटाचा आणि बिकट परिस्थितीचा उल्लेख केला. या सुसाइड नोटमध्ये त्यांनी आपल्या या आत्मघाती निर्णयासाठी कोणालाही दोषी धरु नये, असे स्पष्टपणे लिहिले. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, आर्थिक विवंचनेव्यतिरिक्त यामागे आणखी काही कारण आहे का, याचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरु केला. एकाच घरातील तीन व्यक्तींच्या अशा करुण अंतामुळे मोरवाडी आणि पिंपरी परिसरात शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'टोमणे पचवता येत नसतील तर...' यशस्वी जयस्वालच्या कृत्यावर दिग्गज क्रिकेटपटू भडकला; मैदानावरील राड्यानंतर सुनावले खडे बोल

Colvale jail: कोलवाळ जेलच्या भिंतीआड 'काळाबाजार'? कैद्यांना मद्य, अमली पदार्थ, स्मार्टफोन अन् परफ्युमचा 'स्पेशल सप्लाय'; धक्कादायक माहिती समोर

Guinea Landfill Collapse: पहाटेची झोप ठरली अखेरची! कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू; गिनी देशातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

Bison In Goa: एक दोन नव्हे तर तब्बल 9 गवे! कुर्टी परिसरात गव्यांच्या टोळीचा बिनधास्त वावर; स्थानिकांत भीती, रानात हुसकावून लावण्याची मागणी

"तुम्ही RSS चे एजंट बनलात..." कश्मीरी पंडितांना दहशतवाद्यांची पुन्हा उघड धमकी; नावासह घर क्रमांक लिहून पाठवलं चिथावणीखोर पत्र

SCROLL FOR NEXT