Maharashtra: MSRTC employees call for strike to pay allowances and arrears Dainik Gomantak
महाराष्ट्र

दिवाळीच्या तोंडावरच 'लालपरी' वर दुहेरी संकट, शासनाची भाडेवाढ अन् कर्मचारी संपावर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून, लालपरीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्या अन्यथा संप करू असा इशारा ऐन दिवाळीच्या तोंडावर देण्यात आला आहे.

Abhijeet Pote

दिवाळीच्या (Diwali) तोंडावरच सर्वसामान्यांची लाईफलाईन असलेली लालपरीचा (MSRTC) प्रवास महाग होण्याच्या मार्गावर आहे. आधीच सर्वसामान्य महागाईची झालं सोसत असतानाच आता ही भाडेवाढ पुन्हा एकदा सर्वसामन्यांना धक्का बसत आहे. तर या महागाई बरोबरच दुसरीकडे एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संपाची तलवार उपसली आहे. (Bus Employees on Strike)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून, लालपरीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्या अन्यथा संप करू असा इशारा ऐन दिवाळीच्या तोंडावर देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी लालपरी कर्मचारी संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे ही मागणी केली आहे . तर दुसरीकडे १७ संघटनांचा सहभाग असलेल्या संयुक्त कृती समितीने देखील लालपरी कर्मचाऱ्यांना दिवाळी अगोदर भत्ते आणि थकबाकी द्या,अन्यथा बेमुदत उपोषण करु असा इशारा सरकारला दिला आहे.

कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर या महिन्याचे वेतन दिवाळी अगोदर देण्यात यावे, तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमीदेण्यात यावी या मागण्यांसाठी महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने २७ ऑक्टोबर दिवशी राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून एस टी कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. सतत येणार पैशाचं संकट आणि संसार चालवण्याचं टेन्शन यामुळे अनेक कर्मचारी आत्महत्या करत आहेत. एस.टी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यामुळे आत्महत्या करणाऱ्याचे प्रमाण वाढत आहे. आणि तरीही त्यांचे प्रश्न का सुटत नाहीत हा खरा प्रश्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT