Nawab Malik Dainik Gomantak
महाराष्ट्र

नवाब मलिकांची प्रकृती खालावली, रुग्णालयात करावे लागले दाखल

महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोमवारी तुरुंगातून रुग्णालयात नेण्यात आले.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोमवारी तुरुंगातून रुग्णालयात नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांची प्रकृती तीन दिवसांपासून खराब होती. वैद्यकीय आधारावर त्यांनी विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. इडी आज मुंबईतील (Mumbai) विशेष न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करणार होती. (Maharashtra Minister Nawab Malik's health deteriorated and he was taken to hospital on a stretcher)

दरम्यान, नवाब मलिक (Nawab Malik) यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या वकिलाने सांगितले की, मलिक हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना स्ट्रेचरने आर्थर रोड जेलमधून जेजे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, महाराष्ट्राच्या (Maharashtra) मंत्र्याची प्रकृती बिघडली असेल तर तपास यंत्रणेला का कळवण्यात आले नाही, असा सवाल ईडीने केला आहे. त्यावर ईडीने पुढील तारखेला सुनावणी घेण्याची मागणी केली. मात्र आरोपीचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अशा स्थितीत पुढील सुनावणी सुरु राहणार आहे.

तसेच, नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या वतीने कपिल सिब्बल म्हणाले की, ''2022 मध्ये त्यांना ज्या प्रकरणात अटक करण्यात आली, ते प्रकरण 1999 चे आहे? 5 हजार पानांच्या आरोपपत्रामुळे विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. प्रथमदर्शनी माझ्यावर कोणताही खटला दाखल झालेला नाही. त्यामुळे हे पीएमएलए प्रकरण बनत नाही.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT