Lockdown Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: राज्यात पुन्हा Lockdown? 'या' दोन जिल्ह्यांना चिंता

राज्य सरकार तज्ज्ञांच्या केंद्रीय पथकाच्या (Central team of experts) अहवालाची प्रतीक्षा करीत असल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे (Covid-19) निर्णाण झालेली परिस्थिती पाहता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने कोविडग्रस्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुर्ण लॉकडाउन लावण्याचा विचार करत असल्याचे समजते आहे. (Maharashtra under lockdown? Alert for these 'two' districts)

मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकार तज्ज्ञांच्या केंद्रीय पथकाच्या अहवालाची प्रतीक्षा करीत आहे, तर सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन जिल्ह्यांचा दौरा देखील करण्यात आला असल्याचे समजते आहे. या दोन्ही जिल्ह्यातील परिस्थिती पाहता केंद्रीय पथकाने पुर्ण लॉकडाऊन लागु करण्याची शिफारस केली असल्याचे देखील समजते आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे या विषयावर बोलताना म्हणाले की, राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा या दोन जिल्ह्यांतील परिस्थिती चिंताजनक आहे.

दरम्यान, केंद्रीय पथकाने या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर टेस्टींग, कॉन्टॅक्ट ट्रेसींग आणि लसीकरणावर भर देण्याचा सल्ला दिला असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच आम्ही केंद्राला लसींचा पुरवठा वाढवण्याची देखील विनंती केली असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

सोमवारी महाराष्ट्राच्या कोरोना रुग्णांची संख्या 62,20,207 वर गेली, तर मृतांचा आकडा 1,27,097 वर पोचला आहे. राज्यात सध्या 96,375 रुग्ण उपचार घेत आहेत. विशेष बाब ही आहे की, रुग्णाच्या बरे होण्याचे प्रमाण आता 96.353 वर पोहोचले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT