Maharashtra Heatwave Alert Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Heatwave Alert: शाळांच्या वेळापत्रकात होणार बदल

पुढील तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असून हवामान विभागाने 12 जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला आहे

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील येत्या दोन ते चार दिवसांत अनेक जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढणार आहे. पुढील तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असून हवामान विभागाने 12 जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अकोला, भंडारा या जिल्ह्यांमधील अनेक भागामध्ये तापमान वाढले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये या जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आल आहे.

राज्यातील वाढते तापमान लक्षात घेता शाळेच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांनी शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यात कडक ऊन जाणवत असल्यानं सध्या सुरु असलेली शाळेची 7 ते 12 ची वेळ बदलून 7 ते 10 करण्यात यावी, अशी सूचना पालकांनी केली होती.

याच पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सीईओ यांच्याशी चर्चा करून जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलेत. हवामान विभागानं राज्यातील 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केलाय. हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेसंदर्भात नागरिकांना सूचनाही दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Foundational Learning Survey: पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांचा आता 'लर्निंग सर्व्हे'; वाचन, लेखन अन् गणितातील पायाभूत कौशल्यांची कमतरता शोधणार

Rule Change: LPG सिलेंडर, FD, ATMपासून वाहनांच्या किमतीपर्यंत; 1 ऑक्टोबरपासून बदलले 6 मोठे नियम! तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Goa Tourism: दाबोळीवर उतरले 162 रशियन 'पाहुणे'; 2026-27 पर्यटन हंगामातील पहिले चार्टर दाखल, गोव्यात जंगी स्वागत

Gujarat ATS Drug Seizure: अरबी समुद्रात 3 हजार कोटींचे ड्रग्स जप्त! इराणच्या जहाजातून 526 किलो अमलीपदार्थ, पाकिस्तानचे 5 तस्कर ताब्यात

Rohit Sharma Celebration: 35वं वनडे शतक अन् रोहित शर्माचा हटके अंदाज! खास सेलिब्रेशनचा अर्थ विचारताच हिटमॅन म्हणाला, 'हे माझ्यासाठी...' VIDEO

SCROLL FOR NEXT