Maharashtra: लसीकरण करणे आवश्यकच अन्यथा पिझ्झा,बर्गर विसरा Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: लसीकरण करणे आवश्यकच अन्यथा पिझ्झा,बर्गर विसरा

राज्याची तिसऱ्या लाटेकडे वाटचाल होत असून, याला आळा घालण्यासाठी लसीकरण (Vaccination) हाच एकमेव मार्ग आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी 15 ते 18 या वयोगतील मुलांचे लसीकरण वेगाने करण्यास सुरुवात केली आहे. कारण लसीकरणाशिवाय पर्याय नाही. राज्याची तिसऱ्या लाटेकडे वाटचाल होत असून, याला आळा घालण्यासाठी लसीकरण (Vaccination) हाच एकमेव मार्ग आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यांसाठी पोलिसाना आणि सरकार वेळीप्रसंगी गुन्हे नोंदवून कारवाई करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात, असा स्पष्ट इशारा राजेश टोपे यांनी दिला.

महाराष्ट्रामध्ये मुंबई (Mumbai) , पुणे आणि ठाणे या तीन शहरात ओमिक्रॉन विषाणुचा (Omicron Variant) प्रादुर्भाव अधिक आहे. यामुळे येथील परिस्थिती पाहता या शहरात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण राज्यातील इतर भागांमध्ये अशी परिस्थिति नाही. यामुळे त्या भागांमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु रुग्णसंख्येत वाढ झाल्यास भविष्यात शाळा बंद करू शकतात, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

वेळोवेळी ओमिक्रॉन विषाणुचा आढावा घेणे सुरू आहे. आवश्यकता वाटल्यास अधिक निर्बंध घालण्यात येतील. यामुळे नागरिकांनी सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करावे. घराबाहेर पडताना मास्क लावावे, गर्दी टाळावी, घरी आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवावे. तसेच ओमिक्रॉन विषाणुची लक्षणे आढळल्यास लगेच आरोग्य तज्ञाशी संपर्क साधावा.असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.

* लसीकरण आवश्यक

राज्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरणाला महत्व दिले गेले आहे. यामुळे लसीकरण वेगाने सुरू झाले आहे. तरुण पिढीला सुरक्षित राहायचे असेल तर त्यांनी लसीकरण करणे आवश्यक आहे. तसेच बर्गर आणि पिझ्झा घ्यायचा असेल तर लस घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे लसीकरण करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तरुण पिढीतील मुलांना केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT