Maharashtra government spends huge on Sahyadri Guesthouse repair work Dainik Gomantak
महाराष्ट्र

सह्याद्री अतिथीगृहाच्या फक्त डागडुजीसाठी महाराष्ट्र सरकारची कोट्यवधींची उधळपट्टी

व्हीव्हीआयपींसाठी बांधण्यात आलेल्या सह्याद्री अतिथीगृहावर (Sahyadri Guest House) कोट्यवधी रुपयांची डागदुजी करून बीलं लाटली गेली असल्याची धक्कदायक माहिती समोर येत आहे.(Maharashtra government)

दैनिक गोमन्तक

एकीकडे कोरोनामुळे(COVID-19) तर काही दिवसानंतर पूरपरिस्थितीमुळे(Floods) राज्याची तिजोरी पूर्णपणे खाली होताना दिसत आहे. मात्र असे असूनही दुसरीकडे सरकार पैशाची उधळपट्टी करत असल्याचे समोर येत आहे.कारण रायाचे सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त छोट्या मोठ्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांची उधळण करत असल्याचं समोर येत आहे . व्हीव्हीआयपींसाठी बांधण्यात आलेल्या सह्याद्री अतिथीगृहावर (Sahyadri Guest House) कोट्यवधी रुपयांची डागदुजी करून बीलं लाटली गेली असल्याची धक्कदायक माहिती समोर येत आहे. मात्र एवढा खरेच करूनही सह्याद्री अतिथीगृह जैसेथे तसेच राहत आहे. (Maharashtra government spends huge on Sahyadri Guesthouse repair work)

सह्याद्री अतिथीगृहाच्या डागडुजीसाठी थोडेथोडके नाही तर तब्बल 1 कोटी 89 लाख 32 हजार 930 रुपये इतका खर्च करण्यात आला असून इतके पैसे फक्त सिंलिग दुरुस्त करणे, 3 फुटांची कपाऊंड वॅाल बांधणे, खिडक्या/ दरवाजे बसवणे, वूडन फ्लोरिंग बसवणे, संडास/बाथरूम दुरुस्त करणे हीच कामे इतक्या मोठ्या रकमेतून करण्यात आली आहे.

सद्यस्थितीलाही सह्याद्री अतिथी गृहावर निघालेले दरावाजे, खिडक्या वाळवीच्या प्रादुर्भावामुळे एकदम पोखरून खराब झाल्या आहेत. त्यामुळे सदर सामान निकामी झाल्यामुळे डेब्रिजमध्ये फेकून देण्यात आलं आहे असं उत्तर त्यांना देण्यात आलं आहे. मात्र ज्या सह्याद्री अतिथीगृहावर रोज व्हीव्हीआयपी येत जात असतात तिकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रोज ठाण मांडून आहेत. या अतिथीगृहात एवढी रेलचेल असताना तिकडे दरवाजे खिडक्या वाळवी लागेपर्यंत ठेवले जातील का असा प्रश्नच सामान्यांना पडतोय यासगळ्यातुन केवळ सार्वजानिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणाचं दिसून येत आहे. आणि याच हलगर्जीपणामुळे काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे थोडक्यात वाचले होते कारण त्यांची बैठक चालू असतानाच सह्याद्री अतिथीगृहातलं सिलिंग कोसळलं होतं.

सरकारी तिजोरी आधीच खाली आहे, त्यातच सर्वांना आलिशान घरे जर पाहिजे असतील तर याचा ताण नक्कीच सर्वसामान्यांच्या खिशावर बसणारा असेल तर मात्र याचा उपयोग तो काय?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT