ST कर्मचारी  Dainik Gomantak
महाराष्ट्र

एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा नाही तर...:सदाभाऊ खोत

कर्मचाऱ्यांवर (Employees) निलंबनाची (suspend) कारवाई केली आहे. आता मात्र माघार नाहीच असा पावित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: ST कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत हा संप सुरु राहणार आहे असे ST कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. या सुरु असलेल्या संपात गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर ठिय्या मारला असून आंदोलनस्थळी रात्री झोपले.

'मराठी माणूस टिकला पाहिजे' असा दिखावा एकीकडे करायच्या आणि दुसऱ्या बाजूला याच मराठी माणसाला निलंबित करायचे. यातून असे दिसून येते की मराठी माणूस टिकला नाही तर निलंबित झाला पाहिजे, अशी सरकारची मानसिकता आहे. असा घणाघात माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी यावेळी केला.

सदाभाऊ खोत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्यामध्ये 30 पेक्षा जास्त एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या. एस टी कर्मचायऱ्यांच्या काय मागण्या आहेत याची विचारपूस करायला सुद्धा सरकारकडे वेळ नाही. सरकारकडून हजारो जणांना निलंबित केले. सरकारची ही दादागिरी आम्ही चालू देणार नाही. उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे माणूस म्हणून चांगले आहेत. त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना योग्य त्या सूचना द्याव्यात आणि हा प्रश्न मार्गी लावावा. योग्य तोडगा न निघाल्यास थेट परब यांच्या घरावर मोर्चा काढू. आता उग्र आंदोलन करण्यासाठी कर्मचारी आता कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे हटणार नाही.

ST कर्मचारी हे त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे शासनाने निलंबनाच्या कारवाईचा बडगा कर्मचाऱ्यांवर उचलला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील आठ आगारातील 19 चालक, वाहक आणि यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांना निलंबन केले आहे, अशी माहिती जिल्हा वाहतूक नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली आहे. तसेच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. आता मात्र माघार नाहीच असा पावित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रायगड आगाराकडून जिल्ह्यात पुन्हा एसटी वाहतूक सुरू केली होती. परंतु 8 नोव्हेंबर पासून पुन्हा 8 आगारातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. संप मागे घ्यावा यासाठी जिल्हा वाहतूक प्रशासनाकडून विनवणी करण्यात आली होती. तरीही संप सुरूच होता. तसेच जिल्ह्यातील 19 कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. यामुळे कर्मचाऱ्यांत संतापाची भावना झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT