Anil Deshmukh Grants Bail | Anil Deshmukh Latest News  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Anil Deshmukh Grants Bail: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर

सीबीआय कोर्टाकडून अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. 1 लाखांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) जामीन मंजूर झाला आहे. गेल्या 13 महिन्यांपासून ते जेलमध्ये होते. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात वर्षभरापासून आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. विशेष सीबीआय कोर्टाकडून अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. अनिल देशमुख यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये देशमुख यांना ईडीने (ED) अटक केली होती. सीबीआय आणि ईडीने त्यांच्या विरोधात खंडणी वसुलीसह अनेक गंभीर आरोप ठेवले आहेत; मात्र केवळ राजकीय हेतूने माझ्यावर आरोप करण्यात आले असून, माझ्या विरुद्ध तपास यंत्रणेकडे कोणताही ठोस पुरावा नाही, असा दावा केला आहे. तर देशमुख यांनी पदाचा गैरवापर केला, असा आरोप ईडीने ठेवला आहे. वैद्यकीय कारणांसह, वाढते वय आणि आजार अशी कारणे देशमुख यांनी जामीन अर्जात दिली होती.

100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणार अनिल देशमुख आरोपी आहेत. त्यांना आधी ईडीने अटक केली होती. दरम्यान, ईडी प्रकरणी अनिल देशमुख यांना आधीच जामीन मंजूर करण्यात आला होता. आता सीबीआय प्रकरणातही अनिल देशमुख यांना जामीन मिळला आहे.

अनिल देशमुख यांच्यावर जसलोक रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत. ईडीकडून जामीन मिळाल्यानंतरही अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका होऊ शकली नव्हती. सीबीआय प्रकरणातील गुन्ह्यांमुळे अनिल देशमुख यांनी पुन्हा कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. आता ईडीनंतर अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणातील दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT