CM Pramod Sawant Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Election 2024: महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच 'सरकार'; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास!

CM Pramod Sawant: महाराष्ट्राच्या जनतेचा प्रतिसाद आणि पाठिंबा पाहता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

Manish Jadhav

Maharashtra Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विविध मतदारसंघांमध्ये जाहीर प्रचार सभा, व्यवसायिकांशी, युवकांशी वार्तालाप करण्याची संधी आपणास मिळाली. या संपूर्ण प्रचार प्रक्रियेत महाराष्ट्र राज्यात महायुतीला मिळालेला प्रतिसाद हा खूप मोठा असून या निवडणुकीत महायुतीच बाजी मारणार असून पुढील सरकार हे महायुतीचेच असणार, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

साखळीत एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातील महायुतीला लोकांची पसंती आहे. महाराष्ट्रात प्रचारादरम्यान लोकांचा ओघ पाहता. यावेळी महायुतीचे सरकार बिनशर्त येईल यात शंकाच नाही. सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला आकडा महायुती पार करणार व सरकारही स्थापन करणार. असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सावंतांचा हल्लाबोल!

काँग्रेसने गेल्या 60 वर्षात कामगार वर्गाचा छळ केला तसेच त्यांना विकासाची समान संधी दिली नाही, अशी टीका मुख्यमंत्री सावंत यांनी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेतून केली होती. भाजपचे डबल इंजिन सरकार कामगारांच्या कल्याणासाठी काम करेल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी दिले होते.

भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्र राज्यात प्रचारासाठी निवडलेल्या स्टार प्रचारकाच्या यादीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सातव्या क्रमांकावर होते. त्यांच्यावर अनेक मतदारसंघांमध्ये प्रचार सभा व व्यवसायिक, युवक व इतरंशी थेट संवाद साधण्याची जबाबदारी होती. आपल्या अनोख्या शैलीत व प्रभावी भाषणातून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपणास दिलेली जबाबदारी पार पाडली.

तसेच, लेबर कार्डमुळे कामागारांना घर, मुलांसाठी शिक्षण, आरोग्य यासारख्या सुविधा मिळवणे सुलभ झाले. केंद्र आणि राज्य सरकारने कामारांच्या कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नाचेही मुख्यमंत्री सावंत यांनी कौतुक केले होते.

यंदाची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक अर्थांनी खास ठरली. निवडणूक प्रचारादरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. दोन्ही बाजूंकडून विखारी प्रचार झाला. गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. लाडकी बहीण योजनेचा महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक काळात खूप प्रचार केला. सरकारने या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यात 1500 पाठवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT