Devendra Fadnavis Dainik Gomantak
महाराष्ट्र

Vedanta Foxconn: वेदांता फॉक्सकॉन प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अखेर मौन सोडलं

Devendra Fadnavis: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या मुद्यावरून राज्यात राजकीय वाद सूरू झाले आहे.

दैनिक गोमन्तक

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यातव राजकीय वातावरण तापले आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) या प्रकरणी मौन सोडले आहे. वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल फडणवीसांनी वेदांता समूहाचे अनिल अग्रवालांचे आभार मानले आहेत. तसेच सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांवर फडणवीसांनी निशाणा साधला आहे. राजकीय स्वार्थसाठी निराधार दावे केले जात असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट (Twitt) करून म्हटले, वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अनिल अग्रवाल यांचे आभार मानतो. महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू असेही फडणवीस यांनी म्हटले.

विरोधकांवर टीका करत म्हणाले, केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करत आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कोणी लांबविला? असा सवालही त्यांनी केला. स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करण्याचा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

वेदांताचे अनिल अग्रवाल यांनी टिट्व काय म्हटले?

वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता असे त्यांनी सांगितले आहे. जुलैमध्ये महाराष्ट्र सरकारने कसोशीने प्रयत्न केला होता, असे त्यांनी म्हटले.

अनिल अग्रवाल (Anil Agarwal) यांनी ट्विटकरून हे स्पष्ट केलं आहे की, दोन वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यातील सरकारशी करार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तसेच सर्वोत्तम डील त्यांना कोणत्या राज्याकडून मिळते यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. गुजरातकडून त्यांना सर्वोत्तम डील मिळाली. जुलैमध्ये गुजरात सरकारशी त्यांची चर्चा सुरु होती आणि त्यावेळीच त्यांचा करार निश्चित झाल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य असून भविष्यात राज्यात या प्रकल्पाशी संलग्न प्रकल्प आणण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT