Chief Minister Eknath Shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: शिंदे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'Corona नियमांचं उल्लंघन करणाऱ्या...'

Chief Minister Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Cabinet Decision: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गणेशोत्सव आणि दहीहंडी (कृष्ण जन्माष्टमी) संदर्भात संपूर्ण राज्यातील मार्च 2022 पर्यंतचे सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'

मंकीपॉक्सबाबत आरोग्य विभाग सतर्क- मुख्यमंत्री शिंदे

यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, 'मंकीपॉक्सचा (Monkeypox) प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमचा आरोग्य विभाग सतर्क आहे. यासंदर्भात आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.'

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री दिल्लीला रवाना होणार होते. मात्र शिंदे यांचा हा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे. 30 जून रोजी शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिंदे यांचा हा पाचवा दिल्ली दौरा होता.

तत्पूर्वी, त्यांनी 12 शिवसेना खासदारांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. यासोबतच त्यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या शपथविधी सोहळ्यालाही हजेरी लावली होती. महाराष्ट्र सरकारच्या नवीन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यापूर्वीच लवकरच नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

हल्लेखोरांनी कार अडवली अन् 'शेलीं'ना ओढत नेलं, बगदादमध्ये भरदिवसा अमेरिकन महिला पत्रकाराचं अपहरण; सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT