नारळाच्या पानांपासून बनविलेली गणेश मूर्ती  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: 'नारळाच्या पानांपासून' बनविली 31 फूट उंच पर्यावरणपूरक गणेश मूर्ती

गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi)निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यात 31 फूट उंचीचा 'पर्यावरणपूरक' (Eco-friendly)गणपतीची बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली आहे. ही मूर्ती नारळाची साल आणि प्लायवुड यांची बनविली आहे.

दैनिक गोमन्तक

औरंगाबाद: गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) कुलस्वामी प्रतिष्ठान संस्थेने 31 फूट उंच 'पर्यावरणपूरक' गणपतीची मूर्ती बसवली आहे. कुलस्वामी प्रतिष्ठान संस्थेचे विलास कोरडे यांनी सांगितले की, ही बाप्पाची मूर्ती प्लायवूड, लाकडी फळ्या आणि नारळाच्या पानांच्या (Coconut leaf) चटईने बनवलेली आहे. त्याचबरोबर दरवर्षी प्रमाणे समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजकांकडून विविध प्रकारच्या गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते.

खरं तर, गणेश चतुर्थीच्या सणाला, N-6 सिडको परिसरात संस्थेने 31 फूट उंच 'इको-फ्रेंडली' गणपतीची मूर्ती बनवली होती. ही मूर्ती नारळाची साल आणि लाकडी फळ्या आणि प्लायवुड इत्यादी बनलेली आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिस (Plaster of Paris)मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यामुळे आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी झालेल्या नुकसानीमुळे कुलस्वामी प्रतिष्ठान संस्थेच्या सदस्यांनी पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला. तसेच, यावेळी कोरोना महामारीमुळे, सामाजिक अंतर आणि मास्क वापरण्याचे ही नियमांचे पालन केले जात आहे.

कोरोना(Covid-19) चाचणी अनिवार्य :

औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने गणेश मूर्ती विकणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्यासाठी कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे. या चाचणीत जे मूर्ती विकणारे व्यापारी निगेटिव्ह येतील, त्यांनाच गणेश मूर्ती विकण्याची आणि दुकाने उभारण्याची परवानगी असेल. जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांना मात्र दुकान सुरू करण्याची परवानगी दिली जाणार नाही.असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT