The largest Edu Expo in Maharashtra Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रातला सर्वात मोठा Edu Expo: मोफत नोंदणीसाठी येथे क्लिक करा

सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाइन (Online)शैक्षणिक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ सर्व काही ठप्प झाल्याचा शिक्षण क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. शाळा ऑनलाइन सुरु असून यंदा दहावी, बारावीच्या परीक्षासुद्धा रद्द झाल्या. आता निकाल लागल्यानंतर प्रवेश कुठे घ्यायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांसमोर आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व शकांचे निरसन करण्यासाठी आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सकाळ माध्यम समूह मदत करणार आहे.

सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाइन शैक्षणिक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक, नैतिक आणि आर्थिक क्षमता बळकट करण्यासाठी इथे मास्टर प्लान आहे. ‘सकाळ एज्यु एक्स्पो 2021 हे विद्यार्थी आणि भारतातील उत्तमोत्तम महाविद्यालये यांना जोडणारे एक व्हर्च्युअल व्यासपीठ आहे. शैक्षणिक समुपदेशानासाठी 10 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 'सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 होणार आहे.

बारावीनंतर करिअर ओरिएंटेड शॉर्ट टर्म कोर्स करू इच्छिणाऱ्यांना एक संधी सकाळ माध्यम समुहाने निर्माण केली आहे. सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 च्या माध्यमातून असंख्य असे करिअर ओरिएंटेड कोर्स उपलब्ध करून देण्यात येतील. लाइव्ह वेबिनारद्वारे एक्स्पोमध्ये विविध कोर्ससाठी सहभागी होता येईल. सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 मधून भारतातील 50 नामवंत आणि अग्रगण्य अशा विद्यापीठांसोबत जोडले जाणार आहेत. यामध्ये MIT-ADTU, NMIMS, AISSMS, Amrita Vishwa VidyaPeetham, Tech Mahindra Foundation, Convey.in आणि Amity University Mumbai या विद्यापीठ आणि नामांकित संस्थांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी महाविद्यालयाच्या एज्युकेशन एक्स्पर्टशी थेट संपर्क साधता येईल. तसंच कोर्सेसद्वारे कॉलेजकडून देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्तीचा त्वरीत लाभ मिळणार आहे. करीअर घडविणाऱ्या योग्य कोर्ससाठी आजच आपले नाव रजिस्टर करा. यासोबत तुम्हाला स्टॉक मार्केट प्रशिक्षण (हिंदी भाषेत) आणि मुलभूत (बेसिक) स्टॉक मार्केट हे दोन कोर्स विनाशुल्क करता येतील. सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 मध्ये मोफत नोंदणीसाठी www.sakalexpo.com या संकेतस्थळाला भेट द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

Mayna Construction Project: बांधकाम प्रकल्पाविरोधात मोर्चा, मायणावासीय आक्रमक; कुडतरी पंचायतीवर धडक

iPhone 17 Pro वर भन्नाट डील! 1.34 लाखांचा फोन फक्त 56,990 रुपयांत, जाणून घ्या ऑफर

SCROLL FOR NEXT