Karnataka-Maharashtra bus service started Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा अखेर झाली सुरु

महाराष्ट्रात (Maharashtra) एसटी महामंडळाचा संप सुरू असल्याने अनेक जिल्ह्याच्या बस सेवा बंद करण्यात आल्या होत्या.

दैनिक गोमन्तक

बेळगाव : महाराष्ट्रात (Maharashtra) एसटी महामंडळाचा संप सुरू असल्याने अनेक जिल्ह्याच्या बस सेवा बंद करण्यात आल्या होत्या. आणि कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर संप पुकारला होता. त्यामुळे महाराष्ट्रात एसटी महामंडळाची कर्नाटक (Karnataka) बससेवाही बंद होती. आता कर्मचारी कामावर परतल्याने महाराष्ट्र राज्यात बससेवा सरू झाली आहे. आता कर्नाटक परिवहन मंडळाने देखील आपली बस सेवा महाराष्ट्रात सुरू केल्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्र परिवहन बससेवा अखेर सुरू झाली आहे. बेळगावमधून (Belgaum) दोन आणि हुबळी येथून काही बसेस सोमवारपासून महाराष्ट्रात मार्गस्थ झाल्या. मात्र कर्नाटक -महाराष्ट्र बस सेवा पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.

असा आहे बसचा टाइम टेबल

बेळगाव-नाशिक व्हाया पुणे, अहमदनगर सायंकाळी 5:30 वाजता.

हुबळी-शिर्डी व्हाया पुणे, अहमदनगर रात्री 9:15.

बेळगाव-ठाणे व्हाया पुणे रात्री 9:30 वाजता.

हुबळी-पिंपरी व्हाया पुणे रात्री 11:20 वाजता. हुबळी-पिंपरी व्हाया पुणे रात्री 11:55 वाजता.

दरम्यान कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसगाड्या सध्या कोल्हापूर शहरात प्रवेश न करताच परस्पर हायवेवरून पुढे जात आहेत. दरम्यान बेळगाव विभागातून नाशिक आणि ठाणे या दोन ठिकाणी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर हुबळी विभागातून शिर्डी पिंपरी आणि मुंबई या मार्गावर बस गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या सर्व बसेस पुणे मार्गे धावत आहेत. आता महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे संप मागे घेतल्यानंतरच बेळगावातून पूर्ण क्षमतेने महाराष्ट्र आणि कोल्हापूरसाठी बसेस सोडल्या जाणार आहेत.

बेळगाव चे परिवहन वाहतूक नियंत्रण अधिकारी के. के. लमाणी यांनी महाराष्ट्रातील बससेवा सुरू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देत बेळगावातून महाराष्ट्रासाठी आंतरराज्य बससेवा सुरू केली आहे. सध्या बेळगाव विभागातून महाराष्ट्रात दोन बसेस सोडल्या जात आहे. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन पूर्णपणे संपताच कर्नाटकातून एकूण 72 बसेस महाराष्ट्रात सोडल्या जाणार आहेत, असे लमाणी यांनी माध्यमांना सागितले. महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी किंवा कोरोना प्रतिबंधक दोन्ही लसीचे डोस घेतल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.

बहुतेक नागरीकांनी कोरोनाची दुसरी लस घेतलेली असल्याने परिवहन सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा कर्नाटक परिवहन मंडळाने व्यक्त केली आहे. केवळ महाराष्ट्र परिवहन कर्मचाऱ्यांचा संप पूर्णपणे बंद होण्याची प्रतीक्षा कर्नाटक परिवहन मंडळाकडून केली जात आहे. कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेताच बेळगाव-कोल्हापूर दरम्यान बस सेवा सुरू करण्यात आली होती. या दरम्यान काही दिवसातच चंदगड आणि कोवाड बससेवा सुरू केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT