Shiv Sena leader Sanjay Raut Dainik Gomantak
महाराष्ट्र

Patra Chawl land scam case: संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ

Sanjay Raut Latest News: संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना आणखी एक धक्का मिळाला आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजाणी संचालनालयाने (ED) 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर 27 सप्टेंबरला सुनावणी पार पडली होती. मात्र, कोर्टाने संजय राऊत यांना दिलासा दिला नव्हता. कोर्टाने जामीन अर्जावरील सुनावणी 10 ऑक्टोंबरपर्यंत पुढे ढकलली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत सात दिवसांसाठी वाढ करण्यात आली आहे

पत्रा चाळीतील 1039 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत यांचा सुरुवातीपासूनच सहभाग असल्याचा दावा सक्तवसुली ईडीने केला आहे. या प्रकरणात ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. पत्रा चाळ पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग असून अगदी सुरुवातीपासून ते प्रत्येक गोष्ट कृतीत आणण्यात राऊत यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने आरोपपत्रात केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

Rohit Sharma: 'मला घरी बोलावलं, अर्धा तास माझ्यासोबत...' रोहित शर्माबाबत स्टार क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य; सांगितली संपूर्ण कहाणी

GST Collection: गोव्यात पाच महिन्यांत 1,143 कोटींचा जीएसटी जमा; 20,960 सक्रिय करदाते, कॅसिनोंबाबतही मोठी स्पष्टता

Team India ODI Series: 2027 वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेसह 'या' संघांविरुद्ध होणार सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT