Priyanshu Kshatriya Dainik Gomantak
महाराष्ट्र

Jhund Actor: 'झुंड' चित्रपटातील अभिनेता प्रियांशू क्षत्रियला अटक; चोरीत सहभागी असल्याचा आरोप

प्रियांशू क्षत्रिय याने 'झुंड' चित्रपटात 'बाबू'ची भूमिका साकारली होती.

Pramod Yadav

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी दिग्दर्शित केलेल्या 'झुंड' चित्रपटातील (Jhund Film) अभिनेता प्रियांशू क्षत्रियला (Priyanshu Kshatriya) अटक करण्यात आली आहे. प्रियांशू क्षत्रिय याचा 73 हजारांच्या चोरीत सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. प्रियांशू क्षत्रिय याने 'झुंड' चित्रपटात 'बाबू'ची भूमिका साकारली होती.

(‘Jhund’ actor Babu aka Priyanshu Kshatriya arrested for an alleged theft in Nagpur)

नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या मलकापूर परिसरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. या घरातून 73 हजारांचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी चौकशी केली असता या चोरीच्या घटनेत प्रियांशू क्षत्रिय याचा समावेश असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी दिग्दर्शित केलेल्या 'झुंड' चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका केली आहे. 4 मार्च 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. स्लम सॉकर (Slum Soccer) वरती या चित्रपटाची कहानी आधारीत असून, विजय बारसे (Vijay Barse) यांच्या आयुष्यावर आधारीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT