Japanese Encephalitis Dainik Gomantak
महाराष्ट्र

Japanese Virus: कोरोनानंतर आता जपानच्या व्हायरसचा हाहाकार; वाचा लक्षणे अन् उपाय

Japanese Encephalitis: डासांपासून पसरणारा फ्लेविव्हायरसची लक्षणे आणि उपाय जाणून घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोना विषाणूचा (Corona) संसर्ग अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. पण सध्या जपानी एन्सेफलायटीसची प्रकरणे चिंता वाढवत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुण्यात एन्सेफलायटीस विषाणूचे प्रकरण समोर आले असून एका 4 वर्षाच्या मुलाला याची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

  • हा विषाणू डासांच्या चाव्यामुळे पसरतो

जपानी एन्सेफलायटीस विषाणू हा डासांपासून पसरणारा फ्लेविव्हायरस आहे. तो डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. यामुळे सर्व वयोगटातील लोकांना एन्सेफलायटीस विषाणू संसर्गाचा धोका असतो. हा डेंग्यू, पिवळा ताप आणि वेस्ट नाईल व्हायरस सारख्याच वंशाचे आहे.

जपानमध्ये 1871 मध्ये पहिला रुग्ण आढळला

जपानमध्ये 1871 साली एन्सेफलायटीस व्हायरसची पहिली केस समोर आली होती. या कारणास्तव याला जपानी एन्सेफलायटीस व्हायरस देखील म्हणतात. एन्सेफलायटीस विषाणूचा संसर्ग दर खूपच कमी आहे, परंतु एन्सेफलायटीसमुळे मृत्यूचे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत असू शकते.

  • जपानी एन्सेफलायटीसची लक्षणे

केंद्रीय रोग नियंत्रण (CDC) विभागानुसार जपानी एन्सेफलायटीस व्हायरसची अनेक वेळा लक्षणे दिसत नाहीत आणि बहुतेक प्रकरणांमध्ये सुरुवातीस कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. एन्सेफलायटीस विषाणूच्या सामान्य लक्षण

  • संक्रमित लोकांना ताप

  • डोकेदुखी

  • उलट्या

  • मानसिक स्थितीत बदल

  • न्यूरोलॉजिकल लक्षणे

  • अशक्तपणा

जपानी एन्सेफलायटीस विषाणूची लागण झालेल्या लोकांना न्यूरोलॉजिकल रोग होतो. परंतु हे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. या विषाणूची लागण झालेल्या 20 ते 30 टक्के लोकांचा मृत्यू होऊ शकतो. गंभीर संसर्गातून बरे झालेल्या 30 ते 50 टक्के लोकांमध्ये न्यूरोलॉजिकल आणि मानसिक लक्षणे कायम राहण्याची शक्यता असते.

  • काय काळजी घ्यावी

जपानी एन्सेफलायटीस टाळण्यासाठी वेळेवर चाचणी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही जपानी एन्सेफलायटीस विषाणू असलेल्या भागात राहत असाल तर तुमची चाचणी करुन घ्यावी. याशिवाय, जर तुम्हाला जपानी एन्सेफलायटीसची लक्षणे दिसली तर तुम्ही डॉक्टरांना भेटून स्वतःची तपासणी करून घ्यावी.

  • जपानी एन्सेफलायटीसचा उपचार

जपानी एन्सेफलायटीसची (japanese Encephalitis) लागण झालेल्या रुग्णावर सध्या उपचार नाही. संसर्गानंतर विकसित झालेल्या लक्षणांवर आधारित, डॉक्टर उपचार करतात आणि त्यांना निरीक्षणाखाली ठेवतात. विश्रांती व्यतिरिक्त, डॉक्टर संक्रमित व्यक्तीला अधिकाधिक पोषक ज्युस घेण्याचा सल्ला देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT