Gunaratna Sadavarte Dainik Gomantak
महाराष्ट्र

गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीत वाढ

सदावर्ते यांच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी सरकारीपक्षांकडून न्यायालयात करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा अखेर तिढा सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना येत्या 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले होते. सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी न्यालयात सरकारी पक्षाकडून करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर राजकीय घमासनानंतर सदावर्ते यांच्यावरील सुनावणी पार पडली होती. त्यानंतर सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. यातच आज पुन्हा एकदा सदावर्ते यांना न्यायालयात पोलिसांकडून हजर करण्यात आले आहे.

दरम्यान, सदावर्ते यांच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी सरकारीपक्षांकडून न्यायालयात करण्यात आली होती. त्याचबरोबर पोलिसांकडून सदावर्ते यांची 11 दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयात मागणी करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडी 13 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. दरम्यान सदावर्ते यांना एक फोन नागपूरहून आला आहे. मात्र हा फोन करणारा सदर व्यक्ती कोण आहे, याचा तपास पोलिसांना करायचा असल्याचे सदावर्ते यांच्या वकीलाने म्हटले आहे. त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती.

सिल्वर ओकवरील हल्लेखोर कर्मचाऱ्यांना अनिल परबांकडून घरचा रस्ता

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना काल अटक करण्यात आली असून तब्बल 109 कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून ते म्हणाले "येत्या 22 तारखेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत तसेच 22 एप्रिल पर्यंत जे कामगार कामावर रुजू होणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच दिलेल्या मुदतीपर्यंत कामावर हजर राहिल्यास त्या कर्मचार्‍याला कोणत्याही कारवाईला सामोरे जावे लागणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT