Husband killed wife  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Pune Crime : पतीने केला पत्नीचा खून; मृतदेह साडीत गुंडाळून दिला फेकून

नंतर स्वत:च पोलिसांना फोन करून घटनेची माहिती नवऱ्याने दिली.

दैनिक गोमन्तक

Pune Crime : नात्यात संशय आल्यामुळे अनेक ठिकाणी गुन्हे घडल्याच्या घटना आपल्याला माहिती आहेत. चारित्र्यावर संशयावरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पत्नीचा खून (Murder) केल्यानंतर पतीने पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह साडीत गुंडाळून कात्रज बायपास रोड जवळील असलेल्या रिकाम्या कंपाऊंडच्या आत टाकून दिला. ही घटना मंतरवाडी येथे घडली आहे. (Husband kills wife; The body was wrapped in a saree and thrown away)

वरिष्ठ पोलीस (Police) निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सात वर्षांपूर्वी विदया हिचा विवाह राहुलशी झाला. एक वर्षानंतर तिला पतीसह सासरकडील लोकांनी शारिरिक व मानसिक त्रास देण्यास सुरवात केली होती. त्याबाबत सासवड पोलीस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी दिलेल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांना मुलगा झाला. मात्र मागील एक वर्षापूर्वीपासून सासरकडच्या लोकांनी तिला तिच्या चारित्र्यावरून संशय घेऊन मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी तिने पती आणि सासरकडील लोकांच्या विरोधात तक्रार दिली होती. सासवड पोलिसांनी गुन्हा नोंद करून कारवाई त्यांच्यावर केलेली आहे.

मात्र प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. काल सोमवार (21 मार्च) रात्री राहुल याने विदयाचा गळा दाबून तिचा खून केला. तिचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याने मृतदेह साडीत गुंडाळून मोकळ्या प्लॉटमध्ये कंपाऊंडच्या आत फेकून दिला. स्वत:वर संशय येऊ नये खून केल्यानंतर त्याने सकाळी शहर पोलीस मुख्यालयाला फोन करून आपल्या पत्नीचा मृतदेह सदर ठिकाणी पडला असल्याची माहिती दिली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठवला. संशय आल्याने केलेल्या चौकशीत राहूल याने पत्नीचा खून आपण केला असल्याची कबुली दिल्याने त्याला अटक करून लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT