Hasan Mushrif: Chandrakant Patil should fight like a man Dainik Gomantak
महाराष्ट्र

'चंद्रकांत पाटील यांनी पुरुषप्रमाणे लढावे' हसन मुश्रिफांचा इशारा

हा आरोप म्हणजे भाजपचे(BJP)षडयंत्र आणि याचे मास्टरमाइंड चंद्रकांत पाटीलच (Chandrakant Patil) आहेत.(Hasan Mushrif)

दैनिक गोमन्तक

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्रकार परिषदेनंतर हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांचे आभार मानले आहेत. हा आरोप म्हणजे भाजपचे(BJP)षडयंत्र आणि याचे मास्टरमाइंड चंद्रकांत पाटीलच (Chandrakant Patil) आहेत. असे म्हणत त्यांनी भाजपावर जोरदार शरसंधान साधले आहे. मी पक्ष जिल्ह्यत भुईसपाट केला माझ्या याच भीतीमुळे त्यांनी मला भाजप मध्ये येण्याचा प्रस्ताव देखील दिला होता. आज माझ्यामुळेच भाजप कोल्हापूर जिल्ह्यात झिरो आहे आणि याचाच बदला माझ्याकडून घेतला जात आहे .(Hasan Mushrif: Chandrakant Patil should fight like a man)

चंद्रकांत पाटील यांनी पुरुषप्रमाणे लढावे, विनाकारण आरोप करताना माझी हि बदनामी झाली त्याच काय असा सवाल विचारत त्यांनी मानहानीचा दावा ठोकणारच असेही सांगितले आहे. त्यातच किरीट सोमय्या यांनी आज जे आरोप केले आहेत ते तर सपशेल बिनबुडाचे आहेत. माझा आणि जावयाचा या कंपनीशी काहीही संबंध नाही. हे सारे थोतांड खोत आहे.ब्रिक्स इंडिया कम्पनी 44 लाख शेअर कॅपिटल आहे ही शेअर कम्पनी नाही 100 कोटी घोटाळा कसा होईल ते सांगावे असे सांगत त्यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे.

मी एकूण 150 कोटींचा दावा दाखल करणार कारण विनाकारण मला आणि माझ्या कुटूंबाला या सगळ्या आरोपांमध्ये गोवल जात आहे. असे सांगत हसन मुश्रीफ यांनी भाजपच्या काळात किती आणि कसे घोटाळे झाले होते त्याचा पाढाच वाचला आहे. कारण नसताना शरद पवारांचे नाव घेत आहेत त्यांची लायकी तरी आहे का काही जरी झाली तर आमचे सरकार झुकणार नाही हे मात्र नक्की. मंत्री म्हणून माझ्यावर एकही आरोप झाला नाही करुन मी प्रामाणिक पानेच माझं काम करतो तथ्य नसणारे आरोप जर केले तर सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' भाजपचेच प्यादे? चोडणकरांचा उपरोधिक टोला; 'आप'-भाजपमध्ये पंजाब-गोवा 'एक्सचेंज ऑफर' असल्याचा दावा

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

Swamala Campaign: 150 वर्षांचा आयुर्वेदिक वारसा अन् परेश रावल यांची साथ! 'स्वमाला'साठी धूतपापेश्वरची नवी मल्टिमीडिया मोहीम

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

SCROLL FOR NEXT