Raj Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या आदेशानंतर मशिदींसमोर मनसैनिकांनी केले हनुमान चालीसाचे पठण

कुठेही लाऊडस्पीकरवर मोठ्याने अजान ऐकू आल्यास हनुमान चालीसा लाऊडस्पीकरवर लावा

दैनिक गोमन्तक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रानंतर आज मुंबा देवी दर्ग्यासमोर मनसैनिकांकडून आज सकाळी हनूमान चालिसाचे पठण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी हनूमान चालीसाचे पठण करण्यात आले भोंगेही लावण्यात आले. राज्यातील सुरक्षा आणि सुव्यवस्था नियंत्रीत ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी आता मनसे सैनिकांना अटक करण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेले साहित्यही जप्त करण्यात येत आहेत. दरम्यान लाऊडस्पीकरच्या या वादावरून महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झाले त्यांचा अंदाज घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (Hanuman Chalisa Raj Thackeray)

बुधवारी कुठेही लाऊडस्पीकरवर (Loudspeaker) मोठ्याने अजान ऐकू आल्यास हनुमान चालीसा लाऊडस्पीकरवर लावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मंगळवारी केले . अजान लाऊडस्पीकरच्या आवाजाने लोकांना त्रास होत असेल तर 100 डायल करून पोलिसांकडे तक्रार करा , असे ठाकरे यांनी एका खुल्या पत्रात सांगितले .

'रोज तक्रार व्हायला हवी. मी तमाम हिंदूंना आवाहन करतो की, 4 मे रोजी लाऊडस्पीकरवर जिथे अजान दिली जाते, तिथे तुम्ही हनुमान चालीसा लाऊडस्पीकरवर लावा आणि त्यांनाही लाऊडस्पीकर लावल्याने काय अडचण होते हे समजू द्या. मशिदींवरील लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर सर्व स्थानिक मंडळे आणि सजग नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवून आपल्या परिसरातील पोलीस ठाण्यात जमा करावी,' असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

SCROLL FOR NEXT