Gunaratne Sadavarte Dainik Gomantak
महाराष्ट्र

गुणरत्ने सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी केली अटक

माझ्या जीवाला काही झालं तर त्यास वळसे-पाटील जबाबदार असतील, असेही सदावर्ते यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा अखेर तिढा सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना येत्या 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यालयाने दिले आहेत. दुसरीकडे मात्र आज सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. यावेळी गुणरत्ने सदावर्ते यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले होते की, 'माझी हत्या होऊ शकते. माझ्या पत्नीने दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. त्याचबरोबर कोणत्याही स्वरुपाची नोटीस न देता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.' माझ्या जीवाला काही झालं तर त्यास वळसे-पाटील जबाबदार असतील, असेही सदावर्ते यांनी म्हटले होते. मात्र आता मुंबई पोलिसांकडून गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. षडयंत्र रचल्याप्रकरणी सदावर्ते यांना अटक केली आहे. त्यामुळे आता सदावर्ते यांना उद्या न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, गुणरत्ने सदावर्ते यांनी आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना भडकवून शरद पवारांच्या निवासस्थानी पाठवले असल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत, असेही सांगण्यात येत आहे.

तसेच, एसटी कर्मचारी कामावर हजर झाले तर एसटी महामंडळाने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करु नये, ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यांनाही नोकरीवरुन काढले जाणार नाही, अशी तरतूद करण्याचे आदेश बुधवारी न्यायालयाने दिले होते. आमच्या 125 भावंडांचा खून केला असल्याचे म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांविरोधात घोषणा देत ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. त्याचबरोबर गुणरत्ने सदावर्ते आम्हाला जे काही सांगतील तेच आम्ही करणार असल्याचे देखील एसटी कर्मचारी म्हणत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT