Gunaratna Sadavarte Dainik Gomantak
महाराष्ट्र

गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रवादीचे सर्वासर्वे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक निवासस्थानी 8 एप्रिलला एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. दरम्यान पहिल्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याच काम वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलनामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यातच आता गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान, आज बारामतीत एमआयडीसी व टेक्स्टाइल पार्कच्या महिलांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखवत आंदोलन (Movement) केले होते. यावेळी कामगार नेते तुकाराम चौधरी यांनी खळबळजनक वक्तव्य केले. सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी जाहीर केले होते.

सदावर्तेंची सनद रद्द करा

राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या प्रवक्त्या अॅड हेमा पिंपळे यांनी गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील यांची सनद रद्द करावी अशी मागणी केली आहे. अॅड हेमा म्हणाल्या की ," सदावर्ते व जयश्री पाटील हे गुन्हेगारी, प्रक्षोभक, विध्वंसक, चिथावणीखोर मार्ग वकिलीचा वापर करतात. तसेच विशिष्ट प्रतिष्ठितांना टार्गेट करुन असंविधानिक भाषा वापरून समाजाला वेठीस धरतात म्हणून त्यांची सनद रद्द करा."

दुसरीकडे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी माने साखळकर यांनी देखील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते यांची वकिलीची सनद रद्द करण्याची लेखी तक्रार बार कौन्सिलकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

SCROLL FOR NEXT