Gunaratna Sadavarte  Dainik Gomantak
महाराष्ट्र

गुणरत्न सदावर्ते यांना अटकपूर्व जामीन मंजूर

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. यातच गुणरत्न सदावर्ते यांना आज उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये सदावर्ते यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावरुन सदावर्ते यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पुण्यातील (Pune) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 1 सप्टेंबर 2020 रोजी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत अमर रामचंद्र पवार यांच्याकडून फिर्याद देण्यात आली होती.

तसेच, सदावर्ते यांनी मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, याची पडताळणी करण्यासाठी त्यांच्या आवाजाचे काही नमुने घेण आवश्यक असल्याचं महाराष्ट्र सरकारकडून न्यायालयात सांगण्यात आलं होतं. मात्र सातारा पोलिसांनी (Police) याच संदर्भात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात गुणरत्न सदावर्ते यांच्या आवाजाचे नमुने घेतलेले असल्याने आता पुन्हा त्यांच्या आवाजाचे नमुने घेण्याची काय गरज? असा सवालही उच्च न्यायालयाकडून (High Court) उपस्थित करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT