Pune MNS Samir Thigale Dainik Gomantak
महाराष्ट्र

Pune MNS Samir Thigale: मोठी बातमी! मनसे जिल्हाध्यक्षाला खंडणी मागत हवेत गोळीबार, पुण्यातील घटना

धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबीयांसमोरच गोळीबार केल्याने परिसरात आणि कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडला.

कुख्यात गुंडानी हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबीयांसमोरच गोळीबार केल्याने परिसरात आणि कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुंडानी समीर यांच्यावर पिस्तुल रोखून पैशाची मागणी केली होती. पैसे देण्यास नकार दिल्याने गुंडांनी गोळीबार केला. दरम्यान, पैशाची मागणी करणाऱ्या आरोपीवर याआधीही खुनाचा गुन्हा दाखल असून तो सध्या जामीनावर बाहेर आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडला.

समीर यांच्यावर पिस्तुल रोखली खरी पण त्यातून गोळी सुटलीच नाही. त्यानंतर मात्र दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांनी हवेत गोळीबार केला.

राजगुरुनगर पोलिसांनी याप्रकरणी मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT