CM Eknath Shinde Video Twitter
महाराष्ट्र

Eknath Shinde Video: एकनाथ शिंदेंना चिमुकलीने विचारल्या 'मुख्यमंत्री' होण्याच्या टिप्स

Eknath Shind News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका चिमुकलीने विचारले असे प्रश्न जे ऐकून उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झालेत.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एक चिमुकली यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुलगी मुख्यमंत्री होण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा सल्ला विचारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये (Video) दिसणारी चिमुकली अन्नदा डमरे हीने एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन बंगल्यावर भेट घेतली.

भेटीदरम्यान तिने मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांना विचारले की, "पूरग्रस्तांना मदत करून तीही मुख्यमंत्री होऊ शकते का? आसाममध्ये पूर आला होता, तेव्हा तुम्ही लोकांच्या मदतीसाठी पाण्यातून गेला होता. मी पूरग्रस्तांना मदत करू का? ‘मदत करून मी मुख्यमंत्री होऊ शकते का?

* शिंदेंकडून गुवाहाटीला नेण्याचे घेतले वचन

चिमुलकीचे हे निरागस प्रश्न ऐकून तिथे उपस्थित सर्व लोक हसू लागले. चिमुकलीचे मनोबल वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "हो तु नक्कीच मुख्यमंत्री होऊ शकते. " यानंतर अन्नदाने या मुलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गुवाहाटी (Guwahati) येथे नेण्यास सांगितले.

यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हो नक्की जाऊ. शिंदे यांनी मुलीला विचारले की तुला कामाख्या मंदिरात जायचे आहे? अन्नदाने हो म्हणत दिले उत्तर. चिमुकलीच्या या गोष्टी ऐकून मुख्यमंत्री शिंदेंनी चिमुकलीचे कौतुक केले.

एकनाथ शिंदे यांच्यासह 40 शिवसेना आमदारांनी पक्षात बंडखोरी करून महाविकास आघाडीचे सरकार पाडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदारांचा एक गट 22 जून रोजी गुवाहाटीला पोहोचला. त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजे 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT