Pune Gas cylinder Blast News, Pune City News Updates dainik gomantak
महाराष्ट्र

Gas cylinder Blast : पुण्यातील कात्रज परिसरात गॅस सिलिंडरचे स्फोट

आगीत एक व्यक्ती किरकोळ जखमी

दैनिक गोमन्तक

पुणे : कात्रज परिसरातील गंधर्व लॉन्सजवळ गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली असून या स्फोटांमुळे भीषण आगही लागली आहे. तसेच याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच या स्फोटाचा एक व्हिडीओ ही व्हायरल होताना दिसत आहे. तर या स्फोटांमुळे परिसरात खळबळ माजली असून अद्याप हानी झाली आहे किंवा नाही याची माहिती मिळू शकलेली नाही. (Gas Cylinder Exploded at Lawn of Gandharv Lawns in Katra)

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटानास्थळी दाखल झाले असून, आत्तापर्यंत १८ ते २० सिलेंडरचे स्फोट (Cylinder explosion) झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या घटनेमुळे कुणीही जखमी झाल्याचे किंवा कोणतीही जिवितहानी झाल्याचे स्पष्ट झालेले नाही. मात्र, या स्फोटांच्या आवाजांमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Pune Gas cylinder Blast News)

दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यात येत असून या आगीत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती अग्निशमन (Fire brigade) दलाच्या जवानांकडून देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT