Eknath Shinde| Ganesh Festival  Twitter
महाराष्ट्र

Ganesh Festival 2022: पर्यावरणस्नेही गणेशोत्सव करा साजरा; एकनाथ शिंदेचे मंडळांना आवाहन

Ganesh Utsav 2022: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.

दैनिक गोमन्तक

यंदा २ वर्षानंतर गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. पण पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर दिसून येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

गेली दोन वर्षात आपण कोरोनामुळे गणेश उत्सव साजरा करु शकलो नाहीत. पण या वर्षी सर्वत्र गणेश उत्सव भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, उत्पादन आणि वितरण यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्सवाच्या निमित्तानं मी आपणाला विनंती करतो की, या प्लास्टिकमुळं होणार प्रदूषण थांबवण्यासाठी आपण निश्चय करुयात आणि सिंगल यूज प्लास्टिकचा दैनंदिन वापर बंद करुयात, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं आहे

मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करुया आणि पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करुयात, सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

गणपतीच्या आशीर्वादानं कोरोनाचं संकट दूर झाले आहे. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव आपण करत आहोत. बाप्पांचे स्वागत करतांना महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करुयात. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुयात. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण अशा विविध विषयांवर गणेश मंडळांनी जनजागृती करावी, असं आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर परिवारासह गणपती बाप्पांची स्तापना केली.

यंदा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर दिसून येत आहे. मागील दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव (Ganesh Festival) मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता.

मात्र, यावर्षी सर्व नियम आणि निर्बंध शिथील झाल्यानंतर पुन्हा एकदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्यात येणार असल्यानं गणेश भक्तांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे. सोबतच कोरोना आधी ज्या गणेशमुर्तींना मागणी होती, तीच मागणी यावर्षी देखील कायम आहे. घरगुती गणपतींसाठी बाल गणेशाच्या मूर्तींची मागणी यावर्षी वाढलेली दिसते. पीओपीपेक्षा मातीच्या मुर्तींना मागणी अधिक वाढलीय. एकूणच पर्यावरणपूरक (Eco-Friendly) उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर दिसतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT