ganesh Festival  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Ganpati Festival 2022: यंदा गणेशोत्सव अन् दहीहंडी निर्बंधाविना होणार साजरे

दोन वर्षानंतर गणेशोत्सव अन् दहीहंडी होणार जल्लोषात साजरी.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Ganpati Festival 2022: कोरोनामुळे दोन वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव अन् दहीहंडी होणार जल्लोषात साजरी होणार आहे. यंदा निर्बंधाविना गणेशोत्सव दहीहंडी आणि मोहरम सण निर्बंधाविना साजरी करता येणार आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच एसटी बस च्या खास सुविधा देण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास पोलिसांना आदेश देण्यात आले आहे.(Ganpati Festival 2022 New Rules)

गणेशोत्सव, दहीहंडीसह इतर सण जल्लोषात आणि आंनदात साजरे होण्यासाठी येण्या-जाण्याच्या मार्गावरील खड्डे दुरुस्तीच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. त्याचबरोबर मंडप आणि इतर परवानग्या सुटसुटीत व्हाव्यात यासाठी एकखिडकी योजना आणि ऑनलाईन पद्धतीनं परवानग्या देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासाठी कुठल्याही क्लिष्ट अटीशर्ती नसणार, यासाठी कुठलेही चार्जेस द्यावे लागणार नाही, याची सूट देण्यात आली आहे.

तसेच एसटी बस च्या खास सुविधा देण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास पोलिसांना आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी, नियमांचे पालन करण्यास प्राधान्य दिलं पाहिजे. पण नियमांबाबत बागुलबुवा निर्माण केला जाऊ नये अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुंबईत जी नियमावली आहे त्याप्रमाणं राज्यातही व्हाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कोविडकाळात गणेश मुर्तींच्या उंचीवर मर्यादा आणली गेली होती ती मर्यादा हटवण्यात आली आहे.

* बैठकीत घेण्यात आलेले प्रमुख निर्णय

  • गणेश मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध हटवले.

  • मूर्तीकारांना मूर्ती बनविण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार

  • मिरवणूकांवर निर्बंध नाहीत.

  • गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना सर्वांना टोल माफी.

  • कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांवरील साध्या स्वरुपाचे गुन्हे मागे घेणार.

  • गोविंदाच्याबाबतीत न्यायालयाने घालून दिलेले सर्व नियम पाळणे बंधनकारक.

  • सरकारचे नवीन निर्बंध नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT