Copy of Gomantak Banner (33).jpg 
महाराष्ट्र

भंडारा हॉस्पिटल दुर्घटनेप्रकरणी चार जणांवर निलंबनाची कारवाई 

गोमन्तक वृत्तसेवा

भंडारा जिल्ह्यातील हॉस्पिटल मध्ये लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी चार जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिशु नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात आग लागून तीन बालकांचा होरपळुन आणि सात बालकांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सहा जणांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

भंडारा जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटल मध्ये झालेल्या अग्नीकांडात दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत एका डॉक्टरसह तीन परिचारकांवर कारवाई करण्यात आली आहे. या चौघांना निलंबित करण्यात आले आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. व यावेळी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. 

या घटनेनंतर विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. साधना तायडे मिळून सहा जणांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार, बालकांच्या अतिदक्षता विभागातील रेडिएंट वॉर्मर कंट्रोल पॅनलमधील इलेक्ट्रिकल साधनात ठिणगी पडल्याची शक्यता वर्तविली आहे. व त्यामुळे नवजात बालकांसाठी असलेली गादी किंवा पेटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, याचा धूर झाला असावा असे म्हटले आहे. तसेच ही रूम बंद असल्यामुळे आग इतर ठिकाणी पसरली नसण्याची शक्यता या अहवालात मांडण्यात आली आहे.  

याव्यतिरिक्त, जिल्ह्यासाठी अभियंता, सार्वजनिक बांधकाम अभियंता आणि हॉस्पिटलच्या देखभाल दुरुस्तीसाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्याची शिफारस अहवालातून केली आहे. दरम्यान, ही आग लागलेली असताना हॉस्पिटल मधील कर्मचारी, गार्ड यांनी अन्य सात बालकांना वाचवल्याने त्यांचा जीव वाचला असल्याचे आणि आग इतर ठिकाणी पसरली नसल्याचे देखील म्हटले आहे.     

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: “लिटल फॅट, ब्लॅक शर्ट”! नाव, टेबल नंबर सोडून थेट बॉडी-शेमिंग; बंगळुरुमधील प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या कारभारानं खळबळ

Mhadei Water Dispute: 'म्हादईला आई म्हणणे सोपे, वाचविणे कठीण'; न्यायालयीन लढ्यात सरकारची उदासीनता! राजेंद्र केरकर यांची टीका

Myanmar Military Airstrike: म्यानमारमध्ये लष्कराचा बौद्ध मठावर भीषण हवाई हल्ला! 14 जणांचा मृत्यू; 20 गंभीर जखमी

Saligao Constituency: साळगाव मतदारसंघामध्ये चुुरस, जयेश साळगावकर यांचा राजीनामा; केदार नाईकांपुढे पेच

Illegal Night Clubs: 'टिटोज लेन'वरील 17 नाईट क्लब्स रडारवर; आणखी 4 क्लबवर कारवाई, बेकायदा बांधकामांवर हातोडा

SCROLL FOR NEXT